Breaking

Wednesday, September 14, 2022

इंदापूर हादरले! १३ वर्षीय अपंग, मतिमंद मुलीला गोड बोलून नेले फिरायला, त्यानंतर केले कुकर्म https://ift.tt/NlfcYwB

: एका अल्पवयीन १३ वर्षाच्या मतिमंद मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभांगी अमोल कुचेकर (वय २५,रा–चिखली फाटा लासुर्णे),अनिल नलवडे,नाना बगाडे (रा.दोघे,गोतोंडी) यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. (shocking incident happened with a 13 year old in ) पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील एका गावातील इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या अपंग आणि मतिमंद मुलीला नोव्हेंबर २०२१ मध्ये शुंभागी कुचेकर हिने गोड बोलून फिरायला नेले होते. गाडीमधून आलेल्या अनिल नलवडे याच्याबरोबर उसाच्या शेतात संबंधित मुलीला पाठविल्याचा प्रकार घडला. एप्रिल २०२२ पर्यंत वेळोवेळी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. क्लिक करा आणि वाचा- बलात्कारासाठी शुंभागी कुचेकर व नाना बागडे यांनी सहकार्य केल्याचे उघडकीस आले. गेल्या काही दिवसांपूर्वी संबधित मुलीच्या पोटात दुखत असल्याने तपासणीसाठी बारामतीमधील हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ती गरोदर असल्याचे समजले. क्लिक करा आणि वाचा- यानंतर मुलीच्या आईने वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे आणि पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे करीत आहेत. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/FYbuqTg

No comments:

Post a Comment