Breaking

Sunday, September 11, 2022

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी होणार का? मनोहरलाल खट्टर काय म्हणाले? https://ift.tt/O2XghKN

गुरुग्राम : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सोनाली फोगट यांच्या मृत्यू प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी मागणी केल्यास सीबीआय चौकशी करण्याची मागणी करु, असं म्हटलं आहे. सोनाली फोगट यांचे कुंटुंबीय गोवा पोलिसांच्या तपासावर समाधानी नसल्यास आम्ही त्याबाबत मागणी करु, असं मुख्यमंत्री म्हणाले. खट्टर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सोनाली फोगट यांचे कुटुंबीय समाधानी नसल्यास त्यांना सीबीआय चौकशीची मागणी करण्यास सांगितलं आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी गोवा पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर भूमिका मांडू, असं सांगितल्याचं खट्टर म्हणाले. फोगट कुटुंबीय गोवा पोलिसांच्या तपासावर समाधानी नसल्यास सीबीआयकडे प्रकरण वर्ग करण्याची मागणी करु, असं खट्टर म्हणाले. आज दुपारी हरियाणातील हिस्सारमध्ये खाप महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये सोनाली फोगट यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणाच्या तपासाबाबत गोवा पोलिसांनी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती दिली होती. गोवा पोलिसांनी आम्ही सोनाली फोगट मृत्यू प्रकरणात उच्च स्तरीय पातळीवर चर्चा करत आहोत. आम्ही आरोपींविरोधात वस्तुनिष्ठपणे आरोपपत्र दाखल करु, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी म्हटलं होतं. गोवा पोलीस हे गुन्हेगारी, अंमली पदार्थांबाबत कठोर कारवाई करत कुणालाही सोडलं जाणार नसल्याचं म्हटलं. जे लोकं अंमली पदार्थ पुरवठा, ते सोबत बाळगणे आणि त्याचा वापरकरेल त्यांच्याविरोधात कारवाई करु, असं म्हटलं होतं. सोनाली फोगट यांचा मृत्यू ज्या हॉटेलमध्ये मृत्यू झाला होता ते हॉटेल देखील पाडलं जाणार होतं. मात्र, सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानं ती कारवाई स्थगित करण्यात आली होती. राष्ट्रीय हरित लवादाकडून घेतलेली परवानगी देण्यात मालक अपयशी ठरल्यानं पाडकाम करण्यात येणार होतं. सोनाली फोगट यांचा २३ ऑगस्ट रोजी गोव्यात संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. त्या प्रकरणाची देशभर चर्चा झाली होती. सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणाच्या गोवा पोलिसांच्या तपासावर समाधानी नसल्यास त्यांचं कुटुंब गोवा हायकोर्टात धाव घेऊन सीबीआय चौकशीची मागणी करण्याची शक्यता आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2DF8t7J

No comments:

Post a Comment