Breaking

Sunday, September 11, 2022

पाकिस्तानकडून घडली मोठी चूक, फायनलमधील पराभवाचे हे दोन खेळाडू ठरले विलन https://ift.tt/qOgVjIC

दुबई: टी २० आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर १७१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात श्रीलंकेसाठी भानुका राजपक्षेने ४५ चेंडूत ७१ धावा केल्या. यादरम्यान १९ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याला मोठे जीवदानही मिळाले. भानुका राजपक्षेने संघाला धावांचा डोंगर उभारण्यात मदत केली. एकोणिसाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जेमतेम राजपक्षे आऊट होता पण पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे त्याला जीवदान मिळाले आणि पाकिस्तानी संघाला मोठा धक्का बसला. एकोणीसावे षटक मोहम्मद हसनैन टाकत होता. खरे तर सीमारेषेजवळ उभे असलेले शादाब खान आणि आसिफ यांच्यात समन्वयाचा एवढा अभाव होता की दोघांनाही राजपक्षेचा झेल पकडता आला नाही. झेल चुकल्याने, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पडल्याने पाकिस्तानला सर्वात मोठा दणका बसला आणि श्रीलंकेला सहा धावा मिळाल्या. यामुळे राजपक्षेला केवळ जीवदान मिळाले नाही तर श्रीलंकेच्या संघालाही महत्त्वाच्या धावा मिळाल्या. खरं तर, १९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर राजपक्षेने मिड-विकेटच्या दिशेने उंच शॉट खेळला. याआधी हसनैनने सलग तीन डॉट बॉल टाकले होते, त्यामुळे राजपक्षेही खूप दडपणाखाली होता. अशा परिस्थितीत त्याने मोठा फटका मारून डॉट बॉलची भरपाई करण्याचा प्रयत्न केला, त्याचा हा प्रयत्न अयशस्वी होण्यापासून वाचला, मात्र पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांच्या बेफिकीरपणामुळे संघाचे मोठे नुकसान झाले. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आशिया कपच्या या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या सामन्यात नसीम शाहने धमाकेदार सुरुवात केली आणि कुशल मेंडिसच्या रूपाने पहिल्याच षटकात संघाला विकेट मिळवून दिली. यानंतर हरिस रौफने शानदार गोलंदाजी करत संघाला तीन महत्त्वाचे बळी मिळवून दिले. अशाप्रकारे श्रीलंकन संघाच्या टॉप ऑर्डरने ५३ धावांवर ५ विकेट गमावल्या. मात्र, यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजीला विशेष काही दाखवता आले नाही. श्रीलंकेसाठीच्या सामन्यात भानुका राजपक्षेसह वानिंदू हसरंगा यांनीही शानदार खेळी केली. हसरंगाने २१ चेंडूत दमदार ३६ धावा केल्या. याशिवाय धनंजय डी सिल्वानेही २८ धावांची खेळी खेळली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Xlf4ISe

No comments:

Post a Comment