: बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी येथे नदीला लागून असलेल्या ओढ्यावरून जाताना पाच जण वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. श्रीपत पिंपरी ते बार्शी दरम्यान गोरवाडा येथे ओढ्यावरून जाताना पाच जण वाहून गेले होते. ही घटना २८ सप्टेंबर रोजी दुपारी घडली होती. पप्पू शिरसागर, पप्पू कुंभार, दिलीप ताकभाते, अनिता ताकभाते, पोपट घाडगे, अनुसया घाडगे व निखील कुंभार (सर्वजण राहणार श्रीपत पिंपरी,ता बार्शी,जि सोलापूर) हे वाहून गेले होते. पण, सुदैवाने या सर्व ग्रामस्थांना वाचवण्यात यश आले आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. (7 people were swept away but rescued by the people) बुधवारी दुपारी घटना घडली; सुदैवाने सर्व जण वाचले बार्शी ते श्रीपत पिंपरी दरम्यान गोरवाडा येथे हा ओढा आहे. श्रीपतपिंपरीच्या ग्रामस्थांना नेहमी या ओढ्याच्या पुलावरून जीव मुठीत धरून ओढ्यावरून जावे लागते. बुधवारी 28 सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थ हे गोरवाड्याच्या पुलावरून जात होते. पण पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने सात ग्रामस्थ पाण्यासोबत वाहून गेले. ओढ्यापलीकडे थांबलेल्या तरुणांनी ताबडतोब ओढ्याच्या पात्रात उड्या मारल्या आणि वाहून जात असलेल्या सात ग्रामस्थांना वाचविले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा- सातही जण सुखरूप श्रीपतपिंपरी येथे ओढ्यात वाहून जाणाऱ्या सात जणांना वेळेत वाचविले आहे. सर्व जणांची प्रकृती ही धोक्याबाहेर आहे. श्रीपत पिंपरीच्या ग्रामस्थांनी जिल्हा व तालुका प्रशासनाकडे अनेकवेळा पूल बांधण्याची विनंती केली होती. पण ती मागणी अद्यापही प्रलंबित आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/i0Slwgf
No comments:
Post a Comment