Breaking

Saturday, September 3, 2022

भाजपला लोकसभेला फक्त ५० जागा मिळणार, नितीशकुमारांची मोदी शाहांचं टेन्शन वाढवणारी घोषणा https://ift.tt/SIoCmwx

पाटणा : बिहारची राजधानी पाटणामध्ये नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडतेय. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिहं यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ १५० जागा मिळतील, असं म्हटलं. त्याचवेळी नितीशकुमार यांनी यामध्ये दुरुस्ती केली. भाजपला केवळ देशभरात ५० जागा मिळतील आपल्याला त्यांना रोखायचं आहे, म्हणत जदयूच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. भाजपकडून देखील नितीशकुमारांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. नितीशकुमार यांनी भाजपला २०२४ च्या लोकसभा निवणुकीत केवळ ५० जागा मिळतील, असं वक्तव्य केल्यानंतर भाजपचे प्रवक्ते अरविंद सिंह यांनी नितीशकुमारांना सल्ला दिला आहे. नितीशकुमारांनी भाजपवर बोलण्यापूर्वी आघाडी निर्माण करावी, असं म्हटलं आहे. भाजपमुळं जागा घटल्याचा आरोप जदयूच्या कार्यकारिणीच्या बैठकीत बिहारच्या सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा करण्यात आली आहे. राजदसोबत करण्यात आलेल्या आघाडीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आलं. २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या षड्यंत्रामुळं जदयूच्या जागा घटल्याचा दावा करण्यात आला. नितीशकुमारांना त्यावेळी मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, भाजप नेतृत्त्वानं आग्रह केल्यानं नितीशकुमार मुख्यमंत्री झाले, असं बैठकीत सांगण्यात आलं. बिहारच्या विकासासाठी भाजपच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकार आम्हाला मदत करेल,असं वाटलं होत मात्र तसं झालं नाही. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देखील देण्यात आला नाही, असा आरोप देखील जदयूच्या बैठकीत करण्यात आला. बिहारमध्ये दिसलं ते देशात दिसणार जदयूची महत्त्वाची बैठक सुरु आहे. बिहारमध्ये पाटणा शहरात जे बिहारमध्ये दिसलं ते राज्यात दिसणार,असा आशय असणारी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जदयूनं संघटनात्मक बांधणी सुरु केली आहे. जदयूचे लोकसभेत सध्या १६ खासदार आहेत. दरम्यान, नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर राजदसोबत सरकार स्थापन केलं आहे. ते ८ सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. नितीश कुमार यांनी यापूर्वी २०१४ ला दिसलं ते २०२४ मध्ये दिसणार नाही, असं म्हटलं होतं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/pxKZdP9

No comments:

Post a Comment