दुबई : भारताला आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-४मध्ये सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. पाकिस्तान आणि आता श्रीलंकेने भारताला पराभूत केले. पण या दोन पराभवानंतर भारताचे आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आले का, याची माहिती आता समोर आली आहे. आशिया चषकातील सुपर -४ फेरीत भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे, तर श्रीलंकेचा सलग दुसरा विजय आहे. त्यामुळे श्रीलंकेने जवळपास फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. पण भारतीय संघ ाता फयानलमध्ये पोहोचणार की नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण भारताला दोन सामन्यांमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे त्यांना अंतिम फेरीत पोहोचणे खडतर असल्याचे दिसत आहे. पण तरीही त्यांना एक संधी अजून असल्याचे म्हटले जात आहे. कारण भारताचा अजून एक सामना शिल्लक आहे. या सामन्यात भारताने जर विजय साकारला तर त्यांच्यासाठी अंतिम फेरीत पोहोचण्याची एक आशा असेल. पण त्यासाठी आता भारताच्या सामन्यात नेमकं काय होतं, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. त्यामुळे आता भारतीय संघ अफगाणिस्तानच्या सामन्यात कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्वाचे असेल. भारताचा पराभव नेमका कसा झाला, जाणून घ्या...भारताच्या १७४ धावांचा पाठलाग करत असताना श्रीलंकेच्या संघाने दमदार सुरुवात केली. कारण त्यांच्या दोन्ही सलामीवीरांनी सुरुवातीपासूनचच जोरदार आक्रमण करायला सुरुवात केली. त्यामुळे श्रीलंकेला यावेळी ९७ धावांची दमदार सलामी मिळाली. भारत आणि श्रीलंकेचा सामना अखेकच्या षटकापर्यंत रंगला. अखेरच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी सात धावांची गरज होती आणि अर्शदीप सिंग हे षटक टाकत होता. यावेळी अखेरच्या दोन चेंडूंमध्ये श्रीलंकेला दोन धावांची गरज होती. पण श्रीलंकेने या दोन धावा केल्या आणि भारताला पराभवाचा दुसरा धक्का बसला. अनुभवी भुवनेश्वर कुमारने यावेळी १९ व्या षटकात लौकिकाला साजेशी गोलंदाजी केली नाही आणि त्याचा फटकाही यावेळी भारताला बसला. त्यामुळे आता भारताला पुढील सामन्यांची वाट पाहावी लागणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/0s3mnEa
No comments:
Post a Comment