मुंबई : प्रयसीशी व्हिडिओ कॉलवर कडाक्याचे भांडण झाल्यानंतर एका १९ वर्षीय युवकाने टोकाचे पाऊल उचलत स्वत:ला जाळून घेतले. ही घटना मुंबईतील सांताकृझ येथे घडली. सागर प्रशांत जाधव असे या युवकाचे नाव असून त्यावेळी हा युवक त्याच्या घरातच होता. (a youth in mumbai sets himself ablaze on video call with girlfriend suffers 30 per cent burns) स्वत:ला जाळून घेतल्यानंतर सागर याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सागर हा ३० टक्के भाजल्याचे वाकोला पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले. क्लिक करा आणि वाचा- सागरचे त्याच्या प्रेयसीशी भांडण सुरू होते. दोघेही व्हिडिओ कॉलवर बोलत होते. बोलताना त्यांच्यात वाद सुरू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा एका गणपती पंडालला भेट दिल्यानंतर जाधवचा प्रेयसीशी तिच्या विशिष्ट रस्त्याने जाण्यावरून फोनवरून वाद झाला. क्लिक करा आणि वाचा- भांडण वाढत गेल्यानंतर रागाच्या भरात सागरने स्वतःला पेटवून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने खरेच स्वत:ला पेटवले. त्याने परिधान केलेले शर्ट सुती होते. त्याच्या शर्टने पेट घेतला असे अधिकाऱ्याने सांगितले. सागर यांच्या घरी असलेल्या कुटुंबीयांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली आणि त्यांना रुग्णालयात नेले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. क्लिक करा आणि वाचा- आपण स्वत: हे टोकाचे पाऊल उचलले असून यासाठी इतर कोणालाही जबाबदार धरले जाऊ नये असे सागर याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/osUZI7E
No comments:
Post a Comment