Breaking

Tuesday, September 6, 2022

भारताला सलग दुसरा पराभवाचा धक्का, श्रीलंकेने मिळवला दमदार विजय https://ift.tt/umC7hWD

दुबई : भारत आणि श्रीलंकेचा सामना अखेकच्या षटकापर्यंत रंगला. अखेरच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी सात धावांची गरज होती आणि अर्शदीप सिंग हे षटक टाकत होता. यावेळी अखेरच्या दोन चेंडूंमध्ये श्रीलंकेला दोन धावांची गरज होती. पण श्रीलंकेने या दोन धावा केल्या आणि भारताला पराभवाचा दुसरा धक्का बसला. भारताच्या १७४ धावांचा पाठलाग करत असताना श्रीलंकेच्या संघाने दमदार सुरुवात केली. कारण त्यांच्या दोन्ही सलामीवीरांनी सुरुवातीपासूनचच जोरदार आक्रमण करायला सुरुवात केली. त्यामुळे श्रीलंकेला यावेळी ९७ धावांची दमदार सलामी मिळाली. त्यामुळे हा सामना श्रीलंकेच्या बाजूने झुकेल असे वाटत होते. पण त्याचवेळी युजवेंद्र चहलने भारताला एकाच षटकात दोन विकेट्स मिळवून दिल्या. भारताच्या १२ व्या षटकात चहलने सलामीवीर पथुम निसांकाला ५२ धावांवर बाद केले आणि श्रीलंकेची सलामीची जोडी फोडली. त्यानंतर या षटकाच्याच चौथ्या चेंडूवर चहलने चरिथ असालंकाला बाद केले, त्याला यावेळी भोपळाही फोडता आली नाही. रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताला या सामन्यात १७३ धावा करता आल्या होत्या. सलमीवीर लोकेश राहुल यावेळी फक्त सहा धावांवर आऊट झाला. त्यांनतर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. कारण गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने अर्धशतक झळकावले होते. पण या सामन्यात कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. कोहली यावेळी शून्यावर बाद झाला आणि भारताला २ बाद १३ अशी अवस्था झाली होती. पण या संकटातून भारताला बाहेर काढले ते रोहित शर्माने. रोहितने श्रालंकेच्या गोलंदाजीवर सुरुवातीपासूनच जोरदार आक्रमण करायला सुरुवात केली. रोहितने या सामन्यात ४१ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ७१ धावांची खेळी साकारली. रोहित बाद झाल्यावर काही वेळात सूर्यकुमारही बाद झाला, त्याने २९ चेंडूंत ३४ धावा केल्या. हार्दिक पंड्यालाही या सामन्यात मोठी खेळी साकारता आली नाही, त्याला १७ धावा करता आल्या. त्यानंतर संघाची जबाबदारी ही रिषभ पंत आणि दीपक हुडा यांच्यावर होती. पण रिषभ पंतही यावेळी अपयशी ठरला. सलग दुसऱ्यांदा त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. त्यामुळे रोहितने अर्धशत करूनही भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Ii6KvzQ

No comments:

Post a Comment