Breaking

Monday, September 5, 2022

धावा वाचवायला शिकणं गरजेचं; पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्माची प्रतिक्रिया https://ift.tt/OtpoF0M

वृत्तसंस्था, दुबई पाकिस्तानविरुद्धच्या आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेतील 'सुपर-फोर' लढतीत भारताने १८१ धावा केल्या, तरीही भारतास हार पत्करावी लागली. त्यामुळे महत्त्वाच्या सामन्यात दडपणाखाली धावांचे संरक्षण शिकण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केली. भारताने लढत गमावल्यावर दहा-पंधरा धावा कमी पडल्या, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. रोहितला हे मान्य नाही. तो म्हणाला, 'या सामन्याने आम्हाला खूप काही शिकवले. आम्ही चांगली धावसंख्या उभारली होती. कोणत्याही मैदानावर, कोणत्याही परिस्थितीत १८० या धावा नक्कीच चांगल्या असतात.' भारतीय कर्णधाराला दोनशेच्या नजिक धावा केल्यावरही त्याचे संरक्षण करू शकले नाही हे सलत होते. 'आम्हाला नक्कीच खूप काही शिकण्याची गरज आहे. धावांचे संरक्षण करताना कशी मानसिकता हवी हे आम्ही समजून घ्यायला हवे. विजयाचे श्रेय पाकिस्तानला द्यायलाच हवे. त्यांनी नक्कीच आमच्यापेक्षा सरस खेळ केला,' असे रोहितने सांगितले. चुरशीच्या लढतीत लय गमावून चालणार नाही, अशी कबुली रोहितने दिली. महंमद नवाझ आणि महंमद रिझवान यांची भागीदारी अपेक्षेपेक्षा जास्त लांबली असेही त्याने सांगितले. 'या सामन्याच्या वेळी कमालीचे दडपण असणार हे आम्ही जाणून होतो. वर्चस्वासाठी संधी शोधावी लागते. ही लढत खूपच थकवणारी असते. रिझवान आणि नवाझची जोडी जमल्यावरही आम्ही शांत होतो. मात्र, त्यांनी आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त धावा केल्या. दुसऱ्या डावात फलंदाजी जास्त सोपी होती; पण त्यांनी सुरेख खेळी केली,' असे रोहित म्हणाला. विराटने खूप छान खेळी केली. तो चांगला बहरात येत आहे. सहकारी बाद होत असताना विराटने एक बाजू भक्कम लावून धरली. त्याने धावगतीही कमी होणार नाही याची काळजी घेतली. त्याने आम्हाला चांगली धावसंख्या उभारून दिली. - , भारतीय कर्णधार


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/KqmYQip

No comments:

Post a Comment