Breaking

Monday, September 5, 2022

दुर्दैवी! शेतकऱ्याला वाचविण्यासाठी त्याने घेतली विहीरीत उडी, वर येताना पाइप तुटला आणि नको ते घडले https://ift.tt/WG2vdPo

: यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कर्ज काढून उभी केलेल्या शेतीचे नुकसान बळीराजाला असहृय झाले आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्या आहेत. अशीच एक घटना चंद्रपुरात घडली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका शेतकऱ्याने आपले जीवन संपविण्यासाठी विहीरीत उडी घेतली. शेतकऱ्याला वाचविण्यासाठी काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षानेही विहिरीत उडी घेतली. मात्र उपाध्यक्षांच्या प्रयात्नाना यश आले नाही. शेतकऱ्याचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला. मारोती विश्वनाथ नाहगमकर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. (a farmer committed in ) यावर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि पुराने शेतीचे अतोनात नुकसान केले. शेतकऱ्यांना तिबार पेरणी करण्याची वेळ ओढावली. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज, हातऊसणवारी करून शेती उभी केली. मात्र शेतीचे नुकसान बघून शेतकऱ्यांचा धीर खचला. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी जिवन संपविले आहे. क्लिक करा आणि वाचा- कर्जाचं ओझं असहृय झाल्याने पोंभुर्णा तालुक्यात येणाऱ्या घोसरी गावातील मारोती विश्वनाथ नाहगमकर ( वय, ६२ वर्षे ) या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचललं. जीवन संपविण्यासाठी त्याने विहीरीत उडी घेतली. त्याला उडी घेतांना काही लोकांनी बघितलं. काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रवी मरपलीवार हे विहीरपासून जवळच उभे होते. त्यांना ही घटना कळताच मागचा पुढचा विचार न करता रवी मरपल्लीवार यांनी विहीरीत उडी घेतली. क्लिक करा आणि वाचा- शेतकऱ्याला घेऊन बाहेर काढण्यासाठी टाकलेला पाइपने ते वर येत होते. मात्र पाईप तुटल्याने दोघेही पुन्हा खोल पाण्यात बुडाले. या दुर्घटनेत मारुती नाहगमकर यांचा मृत्यू झाला. वाचवण्यासाठी जाणारे रवी मरपल्लीवार हे जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुल पोलीस ठाण्याचे ठाणेदार सतीश सिंह राजपूत यांनी घटनास्थळ गाठले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/5Ml8jUO

No comments:

Post a Comment