Breaking

Monday, September 5, 2022

जुलैमध्ये राज्यात १०६३ बालमृत्यू; मृतांमध्ये १७९ आदिवासी बालके https://ift.tt/4GqXrvy

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई लहान मुले व महिलांच्या आरोग्याचे प्रश्न तत्परतेने सोडवण्याचा दावा राज्य सरकार सातत्याने करीत असले, तरी केवळ जुलै महिन्यातच राज्यात शून्य ते पाच वयोगटातील १०६३ बालमृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये १७९ बालकांचा समावेश आहे. बालमृत्यूंमागील कारणांचे वैद्यकीय विश्लेषण करणे गरजेचे असले, तरी केवळ मृत्यूच्या वेळी संबंधित बालकाला असलेल्या आजाराचीच नोंद ठेवली जाते. त्यामुळेच बालमृत्यूंमागे हे कारण नसल्याचा दावा सरकारकडून केला जातो. मात्र, बालमृत्यूंमागे कुपोषणामुळे निर्माण होणाऱ्या आजारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. बालकांची पोषण स्थिती नोंदवल्यास बालमृत्यूंच्या नेमक्या कारणांचा उलगडा होऊ शकतो, याकडे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी लक्ष वेधले. या संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत व आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांच्याशी सातत्याने संपर्क साधूनही तो होऊ शकला नाही. अंगणवाड्यांमधून बालकांना देण्यात येणारा आहार शिजवण्याचे काम राज्यात अनेक ठिकाणी बचतगट आणि मदतनीस सेविकांच्या माध्यमातून केले जाते. बचतगटांना एका मुलाच्या एका वेळच्या आहारासाठी आठ रुपये दिले जातात. त्यामुळे वाहतूक खर्च, इंधन व श्रमाचा मोबदला हे गणित महागाईमुळे जुळत नाही. ग्रामीण भागातील ५० टक्क्यांहून अधिक बचतगटांनी हे काम करोनानंतर नाकारले आहे. बालकांमधील कुपोषण कमी व्हावे म्हणून मुलांना अंगणवाड्यांतूनच आहार देण्याची योजना राबवण्यात आली होती. मात्र, अनेक जागा रिक्त असल्याने सेविकेला मुलांचा आहार, शिक्षण, वैद्यकीय चाचण्या या पातळ्यांवर लढावे लागते. त्याचा परिणाम आहार वितरणावर होत आहे. राज्यात एक लाख आठ हजार अंगणवाड्या असून, त्यातील १२ हजारपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. 'तेलाच्या किमती वाढल्यापासून तेल बंद करण्यात आले. मुलांना गरम आहार कसा मिळणार? गुळाऐवजी साखर देताना कुपोषित मुलांच्या आरोग्यासाठी ते किती लाभदायक आहे, याचा विचार सरकारने केला का,' असे प्रश्न या प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या कमल परुळेकर यांनी उपस्थित केले. पोषण स्थिती व स्थिती (० ते ५ वर्षे) मध्यम कमी वजन तीव्र कमी वजन एकूण कमी वजनाची बालके अर्भकमृत्यू बालमृत्यू ४,७६,६४१ ८९,११६ ५,६५,७५७ ८३१ २३२ १,४२,६०७ ३८,३६१ १,८०,९६८ १३९ ४० एकूण बालमृत्यू (राज्य प्रकल्प) शून्य ते पाच वर्षे : १०६३ आदिवासी प्रकल्प : १७९


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/bP7CSYn

No comments:

Post a Comment