Breaking

Wednesday, October 5, 2022

सोलापूरमध्ये देवीच्या मिरवणुकीत दोन मंडळात वाद; पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्यानं अनर्थ टळला https://ift.tt/2LD4dIb

सोलापूर: सोलापूर शहरातील विजापूर वेस येथे दोन नवरात्र उत्सव मंडळं एकमेकांना भिडल्याची घटना घडली.मिरवणुकीत ट्रॅक्टर पुढे घेण्याच्या कारणावरून हा वाद झाला.बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ व सार्वजनिक शक्ती महापूजा नवरात्र मंडळाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. बुधवारी ५ ऑक्टोबर रोजी दसऱ्याला सोलापूर शहरात ठिकठिकाणी नवरात्र उत्सव मंडळांनी मोठ्या उत्साहात मिरवणूका काढल्या होत्या.यावेळी शहरातील रस्त्यावर फक्त मिरवणुका होत्या.दोन नवरात्र उत्सव मंडळात वाद होत असल्याचे पाहताच सोलापूर शहर पोलिसांनी प्रसंगावधान साधून सर्व जणांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. पोलिसांनी वेळीच पावलं उचलल्यानं मोठा अनर्थ टळला. विजापूर वेस परिसरात काही वेळ गोंधळ;चार जणांना घेतले ताब्यात बरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ विजापूर वेस या ठिकाणी आल्यानंतर मंडळाचा ट्रॅक्टर पुढे घेण्याच्या कारणावरून सार्वजनिक शक्ती महापूजा मंडळ विजापूर वेस येथील कार्यकर्ते सूचना करत होते.पण, ट्रॅक्टर पुढे सरकत नसल्याने मिरवणूका जागच्या जागी थांबले होते.यावरून वाद होत गेला,काही कार्यकर्ते हे वाद घालू लागले.पोलिसांनी वेळीच कणखर भूमिका घेत जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला.यावेळी विजापूर वेस परिसरात काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.पोलिसांनी तात्काळ मंडळाच्या जवळपास चार ते पाच जणांना ताब्यात घेतले आहे. परिस्थिती नियंत्रणात सोलापूर शहरात नवी पेठ,बाळीवेस,सात रस्ता,एसटी स्टॅण्ड परिसर आदी भागात मोठ्या जल्लोषात नवरात्र उत्सव मंडळाच्या मिरवणुका जात आहेत.विजापूर वेस वगळता सर्व ठिकाणी शांतता आहे.ज्या ठिकाणी गोंधळ झाला तेथे पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/evu8Hys

No comments:

Post a Comment