: दोन वर्षानंतर माजी मुख्यमंत्री हे औरंगाबाद दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यावर केंद्रीय मंत्री यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. चला दोन वर्षांनंतर हे शेतकऱ्यांसाठी तरी बाहेर पडले आहेत. सरकार चालवताना त्यांना असं वाटत होतं की मी घरून चालवू शकतो. पण शेतकऱ्यांच्या भावना घरून समजून घेता येत नसतील म्हणून आता ते औरंगाबादला चालले आहेत, असा टोला मंत्री कपिल पाटील यांनी ठाकरे यांना लगावला आहे. (union minister of state kapil patil criticizes ) बाळासाहेबांची शिवसेना याचे नेतृत्व मुख्यमंत्री शिंदे करतात. आता त्यांच्या पक्षाच्या काय हालचाली आहेत मला माहिती असण्याचे कारण नाही. मात्र त्यांच्या गटातील काही आमदार नाराज आहेत, असे जर सामना पेपरमध्ये छापून येत असेल तर ते तसे बोलणारचय विरोधक असेच बोलणार. बाळासाहेबांच्या शिवेसनेच्या पेपरमध्ये नाराजीची बातमी आली असती तर समजू शकतो. मात्र, अशा खोट्या बातम्या पसरवून लोकांमध्ये आमदारांमध्ये संभ्रम निर्माण होत असेल तर हे बरोबर नाही, असे एका शिंदे गटातील आमदारांच्या कथित नाराजीबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना कपिल पाटील म्हणाले. शहापूरच्या ढाकळी गावामध्ये रेशन दुकानदारांकडून आदिवासी बांधवांची फसवणूक करण्याची घटना घडली असून ती सत्य आहे. मी डीएसओला तात्काळ सूचना दिल्या होत्या. डीएसओने त्याची चौकशी केली व त्यावर एफआयआर दाखल केला आहे. आदिवासी बांधवांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्या रेशन दुकानदाराने १०० च्या ऐवजी ३०० रुपये घेतले. परंतु त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई होईल. त्यांच्या दुकानांचा परवाना देखील रद्द होईल. अशा प्रकारची कारवाई त्याच्यावर निश्चितपणाने होईल. मी आपल्या माध्यमातून आवाहन करीन की रेशन दुकानदारांनी गरीब लोकांच्या भावनांशी खेळ करू नये. ज्या हेतूने राज्य सरकारने हा निर्णय केलाय आणि आनंदाचा शिधा अशा प्रकारची भावना ठेवून लोकांपर्यंत शंभर रुपयांमध्ये ज्या चार वस्तू पोहोचवण्याची संकल्पना केलेली आहे त्याला खऱ्या अर्थाने रेशन दुकानदारांनी सहाय्य करण्याची आवश्यकता आहे. म्हणून कुठेही अशा प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही याची खबरदारी घेऊन लोकांपर्यंत हे पोहोचवण्याचं काम करावे, असे मंत्री पाटील म्हणाले. उद्यापर्यंत नुकसान भरपाई पोहोचेल अशा प्रकारची व्यवस्था निश्चितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होईल असा मला विश्वास आहे. मी आता मुरबाड ला गेलो होतो. दसईच्या पुढे मीही शेतकऱ्यांची संवाद साधला. शेतकऱ्यांना विचारलं पीक अतिशय चांगले आहे. कधी नव्हे ते जास्त पीक आलेले आहे. परंतु शेतात पाणी असल्यामुळे भात कापता येत नाही. कापले तर ठेवायचे कुठे?, पाण्यात ठेवावे लागते. यानंतर जास्त पाणी होऊन पिकाचे नुकसान होऊ नये, अशा प्रकारच्या भावना शेतकऱ्यांच्या आहेत, असे कपिल पाटील म्हणाले. मंत्री पाटील पुढे म्हणाले की, शिध्याबाबतचा निर्णय उशिरा झालेला आहे. शिधा पोहोचवण्यासाठी जितका कालावधी पाहिजे होता त्यापेक्षा कमी कालावधी मिळालेला आहे. तरीही योग्य नियोजन आणि सरकारच्या माध्यमातून हा शिधा सर्वांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे. मला विश्वास आहे उशिरा का होईना, पण लोकांपर्यंत दिवाळीच्या आधी ह्या वस्तू पोहोचतील. कल्याण पश्चिम येथे खासदार कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने सोमवारी दिवाळी पहाट कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाबाबतची पहाणी करण्यासाठी केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री पाटील हे कल्याण मध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला या वेळी त्यांही हे विधान केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/tDp9lG3
No comments:
Post a Comment