सेऊल : दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये हॅलोवीन फेस्टीवल या कार्यकमात चेंगराचेंगरी झाल्यानं १२० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. एफपी या वृत्तसंस्थेनं या संदर्भात वृत्त दिलं आहे. हॅलोवीन फेस्टिवलला जमलेल्या अनेकांना हार्ट अटॅक आल्याचं समोर आलं आहे. हॅलोवीन पार्टीला १ लाखांहून अधिक लोक जमल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. राष्ट्रपती यूं सुक-येओल यांनी योंगसान-गु जिल्ह्यात आपत्ती प्रतिसाद पथकाला तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सेऊलमध्ये ज्या ठिकाणी हॅलोवीन फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं त्या ठिकाणी सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. त्या सेल्फी पाँईटच्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. त्यात १२० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. करोना संसर्गानंतर मोठ्या प्रमाणावर खुल्या पद्धतीनं नो मास्क हॅलोवीन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हॅलोवीन फेस्टिवल ज्या ठिकाणी आयोजित केला जाणार होता तिथं १ लाख लोक जमल्याची प्राथमिक माहिती आहे. रस्त्यावरच उपचार सुरु सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या हॅलोवीन फेस्टिवलच्या व्हिडिओतून काही लोक मोठी गर्दी जमल्यामुळ चक्कर येऊन पडत असल्याचं दिसत आहे. आरोग्य यंत्रणेकडून आपत्कालीन सेवांद्वारे रस्त्यावरच त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलच्या रस्त्यावर मोठ्या संख्येनं लोक हॅलोवीन फेस्टिवल साजरा करण्यासाठी जमले होते. आनंदोत्सव दु:खात बदलला दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये नो मास्क हॅलोवीन फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याला एक लाखांहून अधिक लोक जमले. सेऊलच्या इटावन लेजर जिल्ह्यात ही घटना घडली. आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर आता दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसा सेऊलच्या हॅमिल्टन हॉटेलजवळ एका अरुंद ठिकाणी मोठ्या संख्येनं लोक जमल्यानं चेंगराचेंगरी झाली. सेऊलमध्ये तातडीनं ४०० आपत्कालीन कर्मचारी आणि १४० वाहनांची मदत घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल करुन उपचार केले जात आहेत. पोलीस आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी बेशुद्धावस्थेत असलेल्या नागिकांना रस्त्यावरच सीपीआरद्वारे प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/7HQzDw0
No comments:
Post a Comment