: एकीकडे दिवाळीचा सण सर्वत्र आनंदात साजरा केला जात असताना दुसरी कडे वीज तार जोडण्या साठी गेलेल्या दोन वायरमेनचा विजेच्या धक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात फत्तेपूर गावात घडली. गणेश नेमाडे आणि सुनील परदेशी अशी मयत दोघा वायरमन ची नावे आहेत. या दुर्घटेमुळे जामनेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. ( in Jalgaon due to ) जळगाव जिल्ह्यातील फत्तेपुर गावात एका शेत शिवारात वीज तार तुटल्याची घटना घडली होती. घटनेची माहिती मिळाल्यावर ही तुटलेली वीजेची तार जोडण्यासाठी वायरमन गणेश नेमाडे आणि सुनील परदेशी हे घटनास्थळी गेले होते. याच दरम्यान या दोघा वायरमनना शेतात पडून असलेली वीज तार लक्षात न आल्याने दोघाचाही त्या तारेला स्पर्श झाल्याने जोरदार बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. क्लिक करा आणि वाचा- म्हशीचा देखील झाला धक्क्याने मृत्यू या दोघांचा मृत्यू होण्यापूर्वी शेतात चरण्यासाठी गेलेल्या एका म्हशीचा देखील विजेच्या धक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर दोघांचे मृतदेह जामनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी मृतांच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केल्याचं पाहायला मिळाले आहे. क्लिक करा आणि वाचा- मंत्री गिरीश महाजन यांनी केले सांत्वन या दुर्घटनेनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी मृताच्या नातेवाईकांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. आज दिवाळीच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/GelcoXF
No comments:
Post a Comment