Breaking

Saturday, October 15, 2022

शिंदे गटाचे मिशन मुंबई महापालिका; गिरगावसाठी मोर्चेबांधणी सुरू https://ift.tt/A1Z3NCu

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः बहुभाषक असलेला अंधेरी मतदार संघ पोटनिवडणुकीत पुन्हा काबीज करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष महाविकास आघाडीच्या शक्तीनिशी मैदानात उतरला आहे. त्याचवेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने गिरगावकडे आपला मोर्चा वळवला आहे. शालेय शिक्षणमंत्री यांनी चर्नी रोड स्थानकातील तिकीट काऊंटरसाठी पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. रेल्वे प्रशासनाला तातडीने तिकीट खिडकी उभारण्याची सूचना यावेळी त्यांनी केली आहे. रेल्वे स्थानकातील तिकीट काऊंटरसाठी मंत्री केसरकर यांचा पाहणी दौरा म्हणजे आगामी महापालिकेसाठी मोर्चेबांधणी असल्याची चर्चा या निमित्ताने रंगू लागली आहे. चर्नी रोड स्थानकात विरार दिशेला एकमेव तिकीट काऊंटर आहे. ठाकूरद्वार किंवा चर्चगेट दिशेकडून येणाऱ्या प्रवाशांना तिकीट घ्यायचे असल्यास संपूर्ण फलाट चालून या तिकीट काऊंटरवर यावे लागते. फलाटावरील तिकीट तपासणीस आणि प्रवासी यांच्यात यावरून अनेकदा खटके देखील उडालेले आहे. चर्नी रोड स्थानकात चर्चगेट दिशेला जागा नाही. यामुळे तिकीट काऊंटर उभारता आलेले नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी मंत्री दीपक केसरकर यांना सांगितले. महापालिकेकडून जागा उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी महापालिका आणि अन्य यंत्रणांशी बैठक घेऊन जागेची अडचण सोडवण्यात येईल, असे आश्वासन मंत्री केसरकर यांनी पाहणीवेळी रेल्वे अधिकाऱ्यांना दिले आहे. स्थानकात सर्व फलाटांना जोडणारा पादचारी असावा आणि स्थानकाच्या चर्चगेट दिशेला तिकीट काऊंटर सुरू करावे. तिकीट काऊंटर सुरू होईपर्यंत तीन एटीव्हीएम सुरू करावे, अशी मागणी सर्वप्रथम आम्ही केली होती, असे आम्ही गिरगावकर संस्थेचे गौरव सागवेकर यांनी सांगितले. रेल्वेने एकच एटीव्हीएम सुरू केले. काऊंटर उभारण्याचे काम करण्यात येईल, असे आश्वासन दिले. याबाबत महापालिकेशी देखील बोलणे झाले आहे. तिकीट काऊंटर, पादचारी पूल या कामांसाठी मंत्र्यांनी सांगितल्यावरच रेल्वे प्रशासन काम करणार का, असा प्रश्न या संस्थेने उपस्थित केला आहे. डिसेंबरपर्यंत पुलाची जोडणी पादचारी पुलाची फलाट क्रमांक २-३ वर जोडणी देण्यासाठी ५ ऑक्टोबर रोजी काम सुरू करण्यात आले आहे. डिसेंबरमध्ये हे काम पूर्ण झाल्यावर प्रवाशांना याचा वापर करण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/P4tBIex

No comments:

Post a Comment