नागपूर: जी. एन. साईबाबाप्रकरणी आजचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल हा शहीदांच्या कुटुंबीयांसाठी अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, नक्षलवाद्यांशी लढताना ज्यांना आपला जीव गमवावा लागतो किंवा या लढ्यातील जे पोलrस, जवान शहीद होतात, त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा निकाल अतिशय धक्कादायक आणि निराशाजनक आहे. या निकालाविरोधात आम्ही तातडीने सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. ज्याच्याविरोधात भक्कम पुरावे आहेत, त्याला केवळ विलंबाने खटल्याची परवानगी मिळाली, या एका तांत्रिक कारणामुळे सोडून देणे, हा त्या शहीद कुटुंबांप्रति अन्यायकारक आहे. हे आम्ही सारे सर्वोच्च न्यायालयात योग्यप्रकारे मांडू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. या निकालामुळे त्या कुटुंबीयांना काय वाटत असेल, याचा विचार मी वारंवार करतो आहे, असं उपमुख्यमंत्री म्हणाले. हेही वाचा - नेमकं प्रकरण काय? कथित माओवादी हेम मिश्रा याला गडचिरोली पोलिसांनी अटक केली होती. दलम कमांडर नर्मदाक्का हिच्याकडे तो संदेश घेऊन जात होता आणि हा संदेश साईबाबांनीच पाठविला होता, असा आरोप पोलिसांनी हेम आणि साईबाबा यांच्यावर लावला होता. गडचिरोली पोलिसांनी दिल्ली येथून साईबाबा यांना अटक केली होती. प्रो. जी. एन. साईबाबा व पाच माओवाद्यांना मे २०१४ मध्ये अटक केली होती. त्यानंतर २०१७ मध्ये गडचिरोली कोर्टाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आज मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबाची निर्दोष मुक्तता केली आहे. हेही वाचा -
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/xbJ02LC
No comments:
Post a Comment