वॉशिंग्टन : अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी सप्टेंबर महिन्यात तैवानचा दौरा करुन चीनला ललकारलं होतं. नॅन्सी पेलोसी यांच्या सॅनफ्रान्सिस्को मधील घरावर हल्ला झाला आहे. पेलोसी यांचे पती पॉल पेलोसी यांना हातोड्यानं मारहाण करण्यात आली आहे. डेमोक्रॅटिक स्पीकरच्या कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार ८२ वर्षी पॉल पेलोसी यांची प्रकृती स्थिर असेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. नॅन्सी पेलोसींचे प्रवक्ते ड्रू हेमिल यांनी हल्लेखोरांना अटक केल्याची माहिती दिली आहे. हल्ला नेमक्या कोणत्या कारणामुळं करण्यात आला याची चौकशी करण्यात येत आहे. पॉल पेलोसी यांच्यावर हल्ला झाला तेव्हा नॅन्सी पेलोसी वॉशिंग्टनमध्ये होत्या. नॅन्सी पेलोसी यांनी सप्टेंबरमध्ये तैवानचा दौरा केला होता. तैवानचा दौरा करुन पेलोसी यांनी चीनला ललकारलं होतं. या दौऱ्यानंतर चीननं तैवानवर हल्ले केले होते. नॅन्सी पेलोसी यांना अमेरिकेतील प्रमुख नेत्यांपैकी एक मानलं जातं त्या कुणाला घाबरत नाहीत, अशी त्यांची ओळख आहे. हल्लेखोरांनी हल्ला का केला याचा शोध सॅन फ्रान्सिस्को येथील कपिटल पोलिसांनी कॅलिफोर्नियातील फील्ड ऑफिसमधून स्पेशल एजंट तातडीनं घटनास्थळी पोहोचल्याची माहिती दिली आहे. इस्ट कोस्टवर कॅपिटल पोलिसांना मदत करण्यासाठी एफबीआयला देखील पाठवण्यात आलं आहे. सॅन फ्रान्सिस्को पोलिसांनी एका हल्लेखोराला अटक केली आहे. मात्र, कोणत्या कारणामुळं हल्ला करण्यात हे स्पष्ट झालं नाही. सध्या नॅन्सी पेलोसी यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येनं स्पेशल एजंट, एफबीआय, आणि कॅपिटल पोलीस अधिकारी तैनात आहेत. नॅन्सी पेलोसींनी १९८७ मध्ये सॅन फ्रान्सिस्को घेतलं घर नॅन्सी पेलोसी यांनी १९८७ मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमध्ये घर घेतलं होतं. जानेवारी २०२१ मध्ये काँग्रेसमध्ये एक विधेयक मंजूर झाल्यानंतर पेलोसी यांच्या घरावर हल्ला करुन तोडफोड करण्यात आली होती. तो हल्ला ६ जानेवारी २०२१ ला झाला होता. दरम्यान, नॅन्सी पेलोसी यांचा तैवान दौरा जगभर चर्चेचा विषय ठरला होता. चीनच्या विरोधाला डावलून पेलोसी यांनी तैवानच्या संसदेला संबोधित केलं होतं.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/TAcm9Gz
No comments:
Post a Comment