Breaking

Tuesday, October 4, 2022

मुंबईकडे जाताना शिंदे गटाच्या अर्जुन खोतकरांची मोठी चूक, शिवसेना काँग्रेसनं खिंडीत गाठलंच https://ift.tt/egNC2OF

जालना : समृद्धी महामार्गाचा वापर करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसाठी उदघाटनापूर्वीच समृद्धी महामार्ग खुला? करण्यात आलाय का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उदघाटनापूर्वीच समृद्धी महामार्गाचा वापर करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागणी कैलास गोरंट्याल यांनी जालन्यात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटाचा यावर्षी दसरा मेळावा होत आहे. यासाठी जालन्यातून शिंदे गटाचे अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिंदे गटाचे शिवसैनिक समृद्धी महामार्गाने मुंबईच्या दिशेने आज रवाना झाले. मात्र, उदघाटनापूर्वीच कार्यकर्त्यांसाठी महामार्ग कसा काय खुला करण्यात आला? असा सवाल आमदार गोरंट्याल यांनी उपस्थित केला आहे. अर्जुन खोतकर यांनी समृद्धी महामार्गाचा वापर ही आमची चूक झाल्याचं देखील म्हटलंय. सामान्य नागरिकाने समृद्धी महामार्गाचा वापर केल्यास त्याला दंड आकारण्यात येतो. आता प्रशासन यांच्यावर काय कारवाई करणार आहे? असे त्यांनी म्हटले आहे. उदघाटनापूर्वीच समृद्धी महामार्गाचा वापर करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे. अधिकाऱ्यांसह संबंधितांवर कारवाई करा : अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील अर्जुन खोतकर यांच्यावर टीका केली आहे. समृद्धी महामार्ग अजूनही जनतेसाठी खुला झालेला नाही, अजूनही त्याची काम अपूर्ण आहेत. एखादा नागरिक गेले तर त्यांना हटकलं जातं. मुंबईला शिंदे गटाचा मेळावा आहे त्यासाठी निघालेल्यांचा अपघात झाल्यानंतर ही बाब समोर आली. याला जबाबदार असणारे अधिकारी आणि संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, असं अंबादास दानवे म्हणाले. आज माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिवसैनिक मुंबईतील बीकेसी मैदानावर जाण्यासाठी निघाले होते. बसेस,खाजगी गाड्या आणि रेल्वेच्या माध्यमातून शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उद्याच्या दसरा मेळाव्यासाठी निघाले आहेत.शिवसैनिकांच्या या ताफ्याचं शक्ती प्रदर्शन या सगळ्या गाड्या मुंबईकडे रवाना होताना समृध्दी महामार्गावर करण्यात आलं. अर्जुन खोतकर यांनी प्रकरणी माध्यमांशी बोलताना आम्ही वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून तसं केलं मात्र ती आमची चूक होती, असं म्हटलं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Qy2sNJd

No comments:

Post a Comment