Breaking

Friday, October 28, 2022

शिवसैनिकांनी कैलास पाटलांच्या उपोषणाची धार वाढवली, जलसमाधी ते जिल्हाधिकारी कार्यालयावर शोले स्टाईल आंदोलन https://ift.tt/O9qS81U

उस्मानाबाद : शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी २०२० चा पीक विमा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बजाज अलायन्स कंपनीने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा यासह इतर मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरु केले आहे. मात्र अद्याप कोणता तोडगा निघाला नसल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी आंदोलनाचे वेगवेगळे मार्ग स्वीकारले आहेत. उस्मानाबाद जिल्हाभरात या आंदोलनास शेतकऱ्यांसह विविध राजकीय पक्ष संघटना यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.काही शिवसैनिकांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केलं. तर, दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी पाण्यात उतरुन पीक विमा नुकसान भरपाईची मागणी केली आहे. आक्रमक शिवसैनिक थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर उस्मानाबाद येथील शिवसैनिक आक्रमक झाले होते. शुक्रवारी दुपारी शिवसैनिकानी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून घोषणाबाजी केली. जो पर्यंत शासन निर्णय घेत नाही तो पर्यंत इमारतीच्या खाली उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतला होता. आमदार कैलास पाटील हे ३ लाख ५७ हजार पात्र शेतकऱ्याच्या पिकविमा, मदतसाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसले आहेत आज ५ वा दिवस आहे. आमदार कैलास पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढले आहेत. सरकारनं कांदा लिंबू प्लेट दिली, जेवण दिलेच नाही आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर वेटर आपल्याला अगोदर कांदा लिंबुची प्लेट देतो नंतर काही वेळाने जेवण देतो तसच या सरकारने पात्र शेतकऱ्यांच्या यादया या कांदा लिंबुच्या प्लेट प्रमाणे दिल्या आहेत. जेवणासाठी प्रतिक्षेत ठेवले आहे या सरकारचा निषेध करण्यासाठी आमदार कैलास पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही हे जलसमाधी आंदोलन करत आहोत. जो सरकार निर्णय घेत नाही पर्यंत हे आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केलाय. आज सकाळी पाडोळी(ता उस्मानाबाद) येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे आंदोलनाला चांगला प्रतिसाद पीकविमा, शेतकरी अनुदान आणि ओल्या दुष्काळाच्या मागणी साठी सुरू केलेल्या आंदोलनाचे लोण आता गावोगावी पसरत चालले आहे.कैलास पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उस्मानाबाद शहर शिवसेना शाखेकडून उदया उस्मानाबाद शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तर, जिल्हाधिकारी यांनी २९ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर पर्यंत जिल्हात जमावबंदी व शस्त्रबंदीचे आदेश दिले आहेत


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/6xpAYFC

No comments:

Post a Comment