बीजिंग : चीनचे माजी राष्ट्रपती हू जिंताओ यांना कम्युनिस्ट पार्टीच्या २० व्या काँग्रेसमधून जबरदस्ती बाहेर काढण्यात आलं. संपूर्ण जगभर या प्रकरणाची चर्चा आहे. कम्युनिस्ट पार्टीच्या काँग्रेसमध्ये हू जिंताओ विद्यमान राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या शेजारी बसले होते. हू जिंताओ यांना एका सुरक्षारक्षकानं पकडलं असता त्यांनी शी जिनपिंग यांच्या समोरचा कागद घेण्याचा प्रत्न केला. मात्र, जिनपिंग यांनी तो हिसकावला आणि जिंताओंना धक्का दिला. यानंतर दोन्ही सुरक्षारक्षकांनी हू जिंताओंना उचललं आणि काँग्रेसच्या बाहेर काढलं. यावेळी जिंताओ यांची प्रकृती चांगली दिसत नव्हती. हू जिंताओ व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत कमजोर दिसत आहेत. त्यांच्या हातात एक कागद दिसतो. हे सर्व घडत असताना ते इतर नेत्यांना यासंबंधी सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र, इतर नेते मूकदर्शक बनून राहतात. शी जिनपिंग यांनी यावेळी काही प्रतिक्रिया दिली नाही. पंतप्रधान ली केकियांग यांनी देखील त्यांना प्रतिसाद दिला नाही. यानंत हू जिंताओ यांना दोन सुरक्षारक्षकांनी सीपीसीच्या बाहेर काढलं. जिनपिंग विरोधी गटाचे नेते हू जिंताओ चीन कम्युनिस्ट पार्टीतील शी जिनपिंग यांच्या विरोधी गटाचे नेते म्हणून हू जिंताओ यांची ओळख आहे. जिनपिंग पहिल्यांदा राष्ट्रपती झाले तेव्हा जिंताओ यांनी विरोध केला होता. जिनपिंग यांनी या गोष्टीचा बदला घेतला. कम्युनिस्ट पार्टीत हेबेई आणि ग्वांगडोंग वगळता देशभर जिनपिगं समर्थक नेते पदांवर आहेत. उप पंतप्रधान हू जुनहुआ यांच्याशिवाय हू जिंताओ गटाचा कुठलाही नेता महत्त्वाच्या पदावर नाही. जिनपिंग यांनी विरोध केला नाही तर हू जुनहुआ चीनचे नवे पंतप्रधान होऊ शकतात. त्यांनी लिटील हू या नावनं देखील ओळखलं जातं. हु जिंताओ कोण आहेत? हु जिंताओ हे चीन कम्युनिस्ट पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत. २००२ ते २०१२ पर्यंत ते सीपीसीचे महासचिव होते. २००३ ते २०१३ पर्यंत पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे ते अध्यक्ष होते. २००४ ते २०१२ पर्यंत केंद्रीय सैन्य आयोगाचे अध्यक्ष होते. सीपीसीच्या पॉलिट ब्युरोचे ते सदस्य देखील होते. सीपीसी पॉलिट ब्युरो ही कम्युनिस्ट पार्टीची निर्णय घेणारी महत्त्वाची समिती आहे. हू जिंताओ २००२ ते २०१२ पर्यंत चीनचे सर्वोच्च नेते होते. हु जिंताओ कम्युनिस्ट पार्टीच्या माध्यमातून सत्तेत आले होते. गुइझोऊ आणि तिबेटचे पार्टीचे सचिव म्हणून त्यांनी काम केलं. हू जिंताओ शी जिनपिंग यांच्यापेक्षा अधिक आक्रमक आणि दमनकारी धोरण राबवणारे नेते होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/biXfuBc
No comments:
Post a Comment