अहमदाबाद : भारताची अत्याधुनिक आणि सोयी सुविधा असलेली वंदे भारत अतिवेगवान रेल्वे वंदे भारत ट्रेनचा आज सकाळी अपघात झाला. मुंबईकडून अहमदाबादला येणाऱ्या ट्रेनचा सकाळी ११.१८ मिनिटांनी अपघात झाला. गुजरातमधील वटवा आणि मणिनगर स्टेशन दरम्यान म्हशींच्या कळपाला धडकली. ही ट्रेन मुंबईहून अहमदाबादला निघाली होती. या अपघातात वंदे भारत ट्रेनचा पुढचा भाग तुटला आहे. २० मिनिटं ट्रेन थांबवली अहमदाबाद रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी जितेंद्र जयंत यांच्या माहितीनुसार ही घटना सकाळी ११ च्या सुमारास घडली. अपघातानंतर ट्रेन २० मिनिटं थांबवावी लागली. ट्रेनच्या तुटलेल्या भागाची दुरुस्ती केल्यानंतर ती अहमदाबादकडे रवाना झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३० सप्टेंबरला या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. ही ट्रेन १८० ते २०० प्रतिकिमी वेगानं धावते. भारताची तिसरी वंदे भारत ट्रेन अहमदाबाद मुंबई ही वंदे भारत ट्रेन सेवा सुरु होण्यापूर्वी भारतात आणखी दोन ठिकाणी हे सेवा सुरु आहे. नवी दिल्ली ते वाराणसी, ननवी दिल्ली ते माता वैष्णोदेवी कटरा दरम्यान दोन वंदे भारत ट्रेन धावतात. तिसरी ट्रेन गांधीनगर-अहमदाबाद- मुंबई अशी धावते. रेल्वे बोर्ड भारतात ४०० निम्न उच्च वेगवान वंदे भारत ट्रेन चालवण्याची तयारी करत आहे. वंदे भारत ट्रेन अत्याधुनिक सेवा सुविधा प्रवाशांना दिल्या जतात. जीपीएस आधारित सूचना यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, बायो टॉयलेट, ऑटोमेटिक स्लायडिंग दरवाजे, आपात्कालीन सुविधा असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या वंदे भारत ट्रेनला ३० सप्टेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवला होता. गांधीनगर-अहमदाबाद ते मुंबई अशी ती ट्रे धावते. या ट्रेनचे डबे जंतूरहित आणि वातानुकुलीत असतील. आपात्कालीन स्थिती डब्यात चार दिवे लागतील, अशी सोय करण्यात आली आहे. लोको पायलट आणि प्रवाशी यांच्या संभाषण होईल, अशी सुविधा करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं मराठवाडा रेल कोच कारखान्यातून वंदे भारत ट्रेनच्या १६०० डब्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.प्रत्येक डबा तयार करण्यासाठी आठ ते नऊ कोटींचा खर्च येतो. यासाठी मराठवाडा रेल कोच कारखान्यात आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2XMqrfJ
No comments:
Post a Comment