पुणे : '' यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस नेते आणि खासदार यांची देशव्यापी पदयात्रा सुरू आहे. या पदयात्रेला आतापर्यंत चांगला प्रतिसादही मिळाल्याचं चित्र आहे. त्यामुळे काँग्रेससह इतर बिगरभाजप पक्षांतील कार्यकर्ते आणि पदाधिकारीही या यात्रेत सहभागी होत असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे ही पदयात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर काँग्रेसचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्तेही या पदयात्रेत दिसू शकतात, असा अंदाज लावण्यात येत होता. मात्र या पदयात्रेबाबत आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने भारत जोडो यात्रा काढली आहे. यात्रेत काँग्रेसमधील सर्वांनी सहभागी होणे योग्य आहे. त्यामध्ये इतरांनी सहभागी होण्याचे कारण मला दिसत नाही,' अशी प्रतिक्रिया व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'राष्ट्रवादी काँग्रेस ही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का,' या प्रश्नावर पवार बोलत होते. गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी येथून 'भारत जोडो' यात्रा सुरू झाली. ती येत्या शुक्रवारी राज्यात देगलूर (जि. नांदेड) येथे पोहोचणार आहे. राज्यात दसऱ्या मेळाव्यावरून सुरू असलेल्या संघर्षावरही पवार यांनी टिप्पणी केली. 'राज्यात दसरा मेळाव्यावरून सुरू असलेले राजकारण दुर्दैवी आहे. संघर्ष होत असतात; मात्र त्यामध्येही मर्यादा राखली गेली पाहिजे. या मर्यादा ओलांडून काही होत असेल, तर ते राज्याच्या दृष्टीने चांगले नाही. राज्यातील जबाबदार नेत्यांनी याबाबत पावले टाकली पाहिजे. राज्यातील ज्येष्ठांवर जशी जबाबदारी आहे, तशी राज्याच्या प्रमुखांवरही आहे. ते पक्षाचे प्रमुख असले, तरी राज्यातील १४ कोटी जनतेचेही प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील जबाबदारी अधिक आहे,' असे पवार यांनी नमूद केले. 'या मेळाव्यांतून कटुता वाढणार नाही, अशी मांडणी दोन्ही गटांकडून होईल, अशी अपेक्षा आहे,' अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली. दसरा मेळावा शिवसेनेचा कार्यक्रम असून, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवारास राष्ट्रवादी काँग्रेस सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/YJhQP04
No comments:
Post a Comment