रत्नागिरी : कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयात देवगड पडेल रस्त्यावर रत्नागिरी जिल्हयातील राजापूर अणसुरे येथील एका बत्तीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या युवकाचे नाव दिनेश भिकाजी गावकर असे आहे. हा युवक अणसुरे आडीवाडी येथे राहणारा होता. सिंधुदुर्ग जिल्हयात देवगड पडेल रस्त्यावरील पुरळ गावानजीक युवकाच्या मोटारसायकलला भीषण झाला. या अपघाताची माहिती मिळताच अणसुरे परिसरातील युवक तात्काळ देवगड येथे दाखल झाले. (a young man who was famous as a good ) दिनेश काही कामानिमित्त मोटरसायकलवरून देवगडला गेलेला होता. २० ऑक्टोबर सायंकाळी सातच्या सुमारास सुमो गाडीने ठोकरल्याने त्याचा अपघाती मृत्यु झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. सुमोची धडक इतकी जोरदार होती की त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. अधिक माहितीसाठी विजयदुर्ग पोलीस दूरक्षेत्रात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता विजयदुर्ग पोलीस पोलीस स्टेशनचा फोन बंद होता त्यामुळे अधिक माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, अणसुरे गावातील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सुमोने जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला असून सुमो चालक स्वतःहून पोलीस स्टेशनला दाखल झाला होता. देवगड येथील रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर दिनेश याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.आज शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास आडीवाडी येथील स्मशानभूमीत त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. उत्तम मकॅनिक म्हणून होता प्रसिद्ध दिनेश मिठगवाणे स्टॉप येथे गॅरेज चालवत होता. एक उत्तम मेकॅनिक म्हणून तो प्रसिद्ध होता. मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून तो अनेकांचा मित्र होता. दिनेश यांच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळताच त्याचे मुंबईतील अनेक मित्रपरिवाराने ही गावी धाव घेतली. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.ऐन दिवाळीच्या तोंडावर दिनेशच्या आकस्मिक अपघाती मृत्यूमुळे अणसुरे परिसरावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे ,आई- वडील ,भाऊ विवाहित बहीण असा मोठा परिवार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/R8D3sMx
No comments:
Post a Comment