Breaking

Monday, October 24, 2022

ऋषी सुनक पंतप्रधान होताच नेटकऱ्यांना आशिष नेहराची आठवण, ट्विटरवर कल्पनाशक्तीला बहर https://ift.tt/XrhaiVs

नवी दिल्ली : भारतीय वंशाचे हुजूर पक्षाचे नेते ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान बनले. ब्रिटनचं पंतप्रधानपद मिळवणारे ऋषी सुनक पहिले भारतीयं वंशाचे व्यक्ती ठरले आहेत. ऋषी सुनक यांनी टोरी लीडरशीपमध्ये पेनी मॉर्डंट यांना मागलं टाकत पंतप्रधानपद मिळवलं. त्यांना १८० हून अधिक खासदारांचा पाठिंबा होता. बोरिस जॉन्सन आणि पेनी मॉर्डंट यांनी माघार घेतल्यानं सुनक यांचा मार्ग सुकर झाला. दुसरीकडे ऋषी सुनक पंतप्रधान बनताच नेटकऱ्यांच्या कल्पनाशक्तीला बहर आला. काही नेटकऱ्यांना टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहराची आठवण आली. आशिष नेहरा आणि ऋषी सुनक यांचे फोटो ट्विट करत नेटकऱ्यांनी पोस्ट केल्या. त्यामुळं आशिष नेहरा ट्विटरवर ट्रेंड झाला. नेटकऱ्यांनी आशिष नेहरा आणि ऋषी सुनक भावांसारखे दिसत असल्याचं म्हटलं. काही जणांनी फिल्मी कनेक्शन देखील जुळवण्याचा प्रयत्न केला. निवडक ट्विट दुसरं ट्विट तिसरं ट्विट ऋषी सुनक यांनी खासदारपदाची शपथ भगवतगीतेवर हात ठेऊन घेतली. काही नेटकऱ्यांनी सुनक पंतप्रधान झालेत आता कोहिनूर हिरा परत मिळणार का अशा प्रकारच्या चर्चा सुरु केल्या आहेत. ऋषी सुनक हे दिषी या नावानं देखील ओळखले जातात.इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांची कन्या अक्षता मूर्ती यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे. ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांची भेट कॅलिफोर्नियामध्ये शिक्षण घेत असताना झाली होती. ऋषी सुनक यांना दोन मुली आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/CdqGzhW

No comments:

Post a Comment