Breaking

Saturday, October 8, 2022

आमच्यातल्याच फितुरांनी साथ दिली; अन्यथा तुमच्यात ती धमक नक्कीच नव्हती, सुषमा अंधारेंचा भाजपवर हल्लाबोल https://ift.tt/Z3CasVT

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना नक्की कोणाची ठाकरेंची की शिंदेंची हा वाद सुरु झाला. तर शिवसेनेचे चिन्ह असलेले धनुष्यबाण हे चिन्ह कोण वापरणार याचा वाद देखील निवडणूक आयोगाच्या समोर गेला आहे. ठाकरे आणि शिंदे गटांनी धनुष्यबाण चिन्हावर दावा ठोकला होता. नंतर आता याबाबत निवडणुक आयोगाने खूप मोठा निर्णय दिला आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणुक आयोगाने गोठवले आहे. आणि शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेना हे पक्षाचं नावही दोन्ही गटांना सध्या धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही. अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक पार पडेपर्यंत दोन्ही गटांना हे निर्बंध लागू असणार आहेत. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे. हा निर्णय आल्यानंतर ठाकरे गटातील नेत्यांकडून भाजप आणि शिंदे गट यांचा जोरदार समाचार घेतला आहे. "आम्ही हरलो म्हणजे तुम्ही जिंकलात असं होत नाही. डाव तुमच्या हातात असला तरी जिंकता तुम्हाला येत नाही, मोदी-शहा जी फडणवीसजी तुम्ही जिंकलात? अभिनंदन! पण तुम्ही जिंकू शकला कारण आमच्यातल्याच फितुरांनी साथ दिली; अन्यथा तुमच्यात ती धमक नक्कीच नव्हती. पण आम्ही खडकातूनही पुन्हा उगवू." असं शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हंटल आहे. दरम्यान, पुढे निर्णय काय घ्यायचा यावर दोन्ही गटांकडून खलबत सुरु झाले आहे. उद्या दुपारी यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी नेत्यांची बैठक बोलावली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील संध्याकाळी 7 वाजता आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली असल्याची माहिती आहे. तर हा निर्णय येताच मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर खासदार श्रीकांत शिंदे दाखल झाले आहेत. तर शिंदे गटाचे बडे नेते देखील वर्षावर दाखल होण्यास सुरवात झाली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/hMo8v97

No comments:

Post a Comment