मुंबई : () यांनी ज्योतिषाला हात दाखवून भविष्य जाणून घेतली अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात ऐकायला मिळत असून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी टीकेचा सूर लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष () यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार आणि इतर नेत्यांच्या टीकेला मु्ख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिले आहे. दैनंदिन कामकाज सोडून देवदर्शनाला जाणे, त्याच बरोबर एखाद्या ज्योतिषाला हात दाखवणे याचा अर्थ आत्मविश्वासाचा अभाव असाच होतो. जेव्हा एखाद्याचा आत्मविश्वास डळमळीत होतो तेव्हाच लोक अशा प्रकारच्या गोष्टींकडे वळतात, असे सांगत पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. पवार यांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही तर ३० जून या दिवशीच हात दाखवला. आमच्याकडे आत्मविश्वास होता म्हणून तर ५० आमदार आणि १३ खासदार माझ्यासोबत आले. महाविकास आघाडी सरकावर साधला निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि इतर विरोधकांना उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार हे कुणाचे काम करत होते, महाविकास आघाडीचे सरकार कोणासाठी चालवले जात होते, हे पाहावे अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी टोला लगावला आहे. आम्ही ज्यांना कोणाला हात दाखवाचा होता तो ३० जून याच दिवशी दाखवला आहे. आम्ही त्यांना चांगलाच हात दाखवला आहे, असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले. पवार पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी एके ठिकाणी हात दाखवला मात्र त्याची पूर्ण माहिती माझ्याकडे नाही. जेव्हा आपल्या आत्मविश्वासाला धक्का बसतो, तेव्हा मग व्यक्ती अशा गोष्टीकडे वळते तशी स्थिती आहे का, अशी शंका मनात येत आहे. बुधवारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतले. या दर्शनानंतर मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा सिन्नरकडे वळवला. ते तेथील ईशानेश्वर मंदिरात गेले. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध ज्योतिषी कॅप्टन खरात यांच्याकडून जोतिष्य जाणून घेतले अशी जोरदार चर्चा रंगली. त्यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली. ज्योतिषाकडे जाऊन स्वत:चे ज्योतिष पाहणे याला आता काय म्हणावे?... आमच्यासारखे तर एकदम हतबलच झाले आहेत. जग २१ व्या शतकात जगत आहे. जगात तंत्रज्ञानाचे युग सुरू आहे, आणि याला काय म्हणावे, असे विधान सभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे. या बरोबर संजय राऊत यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. राऊत म्हणाले की, राज्यात अत्यंत दुर्बल सरकार सत्तेत आलेले आहे. सरकारचे प्रमुख हे देव-धर्म तंत्र, मंत्र आणि ज्योतिषासारख्या विषयात अडकलेले दिसतात. त्यामुळे गुजरात, कर्नाटक या राज्यातून महाराष्ट्रावर हल्ले होताना दिसत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/GkgOcer
No comments:
Post a Comment