Breaking

Tuesday, November 15, 2022

त्यांना कमी वेळेत बनायचे होते श्रीमंत; ही शक्कल आली अंगलट, अलगद आले पोलिसांच्या जाळ्यात https://ift.tt/2EcPyYj

अमरावती: जिल्ह्यात दुचाकी चोर सक्रिय झाल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. दुचाकी चोरांची सुळसुळाट झाल्याचे समोर येतात पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेने आपली सूत्रे हलवत आज तब्बल ११ मोटरसायकल आरोपींकडून जप्त करत त्या मूळ मालकाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली. यामुळे अनेक दुचाकी मालकांनी सुटकेचा श्वास सोडत पोलिसांच्या कामगिरी प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. (thieves stole as many as 11 two wheelers and two autos to become rich in a short time) मंगवारी गस्त घालत असताना गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना अशी माहिती मिळाली की दोन व्यक्ती चित्रा चौकात एक चोरी केलेली बाईक घेऊन येत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. यात आरोपी मोहम्मद अबुजर अब्दुल कलीम, (वय १९, रा. बिस्मील्ला नगर अमरावती) आणि अब्दुल तहसीम अब्दुल फईम, (वय १९, रा. बिस्मीला नगर, अमरावती) यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल जप्त केली. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली व त्यांना शहरातील चोरीच्या वाहनांबाबत विचारपूस केली असता त्यांनी अमरावती शहर व नागपूर शहर येथून आणखी काही वाहने चोरी केल्याची कबुली दिली. या वरुन त्यांच्या ताब्यातून एकुण ११ मोटर सायकली (हिरो होंडा स्प्लेंडर) जप्त केल्या. या बाईकची एकूण किंमत ५ लाख ५० हजार व दोन प्रवासी ऑटो (किंमत ८ लाख), असा एकूण १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच या प्रकरणातील आरोपीचा एक साथीदार फरार आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर आणखी मोटर सायकलीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे (गुन्हे शाखा अमरावती शहर) यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेतील सहा. पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल जावेद अहेमद, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय मिश्रा, दिपक सुंदरकर, निलेश पाटील, इजाज शहा, गजानन लुटे यांनी केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ijAvuI3

No comments:

Post a Comment