संजय सूर्यवंशी, नांदेड : 'भारत जोडो' यात्रेच्या नांदेड जिल्ह्यातील प्रतिसादानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवरील संशयाचे भूत आता दूर झालं असं म्हटलं आहे. महाराष्ट्रात या यात्रेला मिळालेल्या लोकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे काँग्रेसचे केंद्रातील नेते देखील खूश झाले असून नांदेडमधील नियोजनाचे सर्व श्रेय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दिले जात आहे. अशोक चव्हाण हे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा मागील महिन्यात जोरदार सुरू होत्या.अशोक चव्हाण यांनी अनेक वेळा माध्यमांसमोर येऊन आपले म्हणणे देखील मांडले होते.आपण काँग्रेस सोडणार नसल्याचे अशोक चव्हाण यांनी अनेक वेळा सांगितले होते. कर्नाटकप्रमाणेच नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात लोकांचे जत्थेच्या जत्थे यात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले.राज्यातील या यात्रेची पहिली सभा नांदेड मध्ये पार पडली. या सभेमध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमली होती. या सभेत काँग्रेसचे देशभरातील नेते सहभागी झाले होते. त्याच बरोबर या यात्रेत प्रदेश काँग्रेसमधील बहुतांश ज्येष्ठ नेते सहभागी झालेले दिसले. राहुल गांधी यांच्यासोबत पृथ्वीराज चव्हाण , सुशीलकुमार शिंदे यांची पदयात्रेतील हसरी छायाचित्रेही चर्चेचा विषय ठरली.दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे भारत जोडो यात्रेला नांदेड जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. या प्रतिसाद मुळे अशोक चव्हाण यांच्या वरील संशयाचे भूत दूर झाले असे म्हटलं जात आहे. अशोक चव्हाण स्टार प्रचारकांच्या यादीत गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, काँग्रेस अध्यक्ष व गांधी कुटुंबासह देशभरातील प्रमुख नेत्यांचा या यादीत समावेश आहे. एकूण ४० प्रचारकांच्या या यादीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तिसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग व कमलनाथ, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुड्डा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा प्रामुख्याने समावेश आहे. महाराष्ट्रातून चव्हाण यांच्या व्यतिरिक्त माजी मंत्री शिवाजीराव मोघे, नसीम खान व रामकिशन ओझा यांचा या यादीत समावेश आहे. १८२ सदस्यीय गुजरात विधानसभेसाठी येत्या १ व ५ डिसेंबरला २ टप्प्यात मतदान होणार असून, मतमोजणी ८ डिसेंबरला होईल. या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत रमेश चेन्नीथला, तारिक अन्वर, बी.के. हरिप्रसाद, मोहन प्रकाश, शक्तिसिंग गोहिल, डॉ. रघू शर्मा, जगदीश ठाकोर, सुखराम राठवा, सचिन पायलट, भरतसिंग सोलंकी, अर्जुन मोडवाडिया, सिद्धार्थ पटेल, अमित चावडा, नरेनभाई राठवा, जिग्नेश मेवानी, इम्रान प्रतापगढी, कन्हैय्या कुमार, कांतिलाल भुरिया, राजेश लिलोथिया, परेश धनानी, विरेंदरसिंग राठोड, उषा नायडू, बी.एम. संदीप, अनंत पटेल, अमरिंदरसिंग राजा व इंद्रविजयसिंग गोहिल यांचाही समावेश आहे
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/xeP7k9R
No comments:
Post a Comment