सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळ बंद होण्याची भीती केंद्रीय मंत्री (Narayan Rane) यांनी व्यक्त केली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री (Jyotiraditya Scindia) यांचे राणे यांनी याबाबत लक्ष वेधले आहे. (there is a possibility of closure of says narayan rane) कोकणातील एक उदयोन्मुख पर्यटनस्थळ म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे. येथे येणाऱ्या विमानांच्या तिकीट भाड्यात असाधारण दरवाढ झाल्यामुळे या भागातील पर्यटकांच्या प्रवासाच्या सुरळीत पणात अडथळा निर्माण होत आहे. चिपी विमानतळापासून १२२ किमी अंतरावर असलेल्या गोवा विमानतळावर स्वस्त विमानभाड्याने वारंवार उड्डाणे होत आहेत. यामुळे सिंधुदुर्ग परिसरातील पर्यटक आणि स्थानिक लोकांना चिपी विमानतळाऐवजी गोवा विमानतळावरून विमान पकडावे लागत आहे. क्लिक करा आणि वाचा- या परिस्थितीमुळे अर्थव्यवस्थेच्या नावाखाली विमान कंपन्यांची सेवा बंद होऊ शकते. या क्षेत्रात सध्या फक्त एकच विमानसेवा कार्यरत आहे आणि सेवा खंडित केल्याने स्थानिक प्रवाशांना त्रास तर होऊ शकतो. शिवाय पर्यटन क्षेत्रालाही धक्का बसू शकतो, अशी भीती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे व्यक्त केली आहे. क्लिक करा आणि वाचा- राणे यांनी शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात राणे यांनी म्हटले आहे की, या खात्याचे मंत्री म्हणून आपण या प्रकरणात हस्तक्षेप करून संबंधित प्राधिकरणाला सल्ला देण्याची व्यवस्था करा आणि विमान कंपन्यांनी त्यांचे चिपी विमानतळासाठीचे विमान भाडे सरकारच्या धोरणानुसार वाजवी ठेवावे जेणेकरुन चिपी विमानतळावर येणाऱ्या विमानांमधील प्रवासी दर वाढेल. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/YbMZuvH
No comments:
Post a Comment