औरंगाबाद : औरंगाबादच्या दोन तरुणांनी संशोधन करत शेतातील पिकावर कोणता रोग पडणार आहे. हे आधीच माहिती होण्यासाठी एक उपकारण तयार केले आहे. या उपकारणाला त्यांनी 'खेती ज्योतिष' स्टार्टअप असे नाव दिले. येत्या काळात या यंत्रचा शेतकऱ्यांना उपयोग होऊन पीक वाचवण्यात मदत होऊ शकते. औरंगाबादेतील समीर पितळे आणि पितळे हे नेहमीच विविध विविध विषयावर संशोधन करत असतात. याच दरम्यान सन २०१८मध्ये ‘स्टार्टअप इंडिया चॅलेंज’मध्ये ‘पोस्ट हार्वेस्ट लॉसेस’ कमी कसे करावे यासाठी स्पर्धा झाली होती. यावेळी त्यांना शेतकऱ्यांचे सर्वात जास्त नुकसान हे पिकावरील रोगामुळे होते, शिवाय बहुतांश शेतकऱ्यांना कोणत्या पिकावर कोणते औषध फवारणी करायचे काही पुरेसे ज्ञान नसते त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे मोठे नुकसान होते. जर पिकावर पडणारे रोग जर आधीच शास्त्रशुद्ध पद्धतीने शेतकऱ्यांना अगोदरच कळाले तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. त्यामुळे त्यांनी सन २०१८ ला उपकारण बनविण्याचे ठरविले होते. आता हे उपकारण बनविण्यात बंधूना यश आले असून आता याचे मोबाईल ॲप तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात अनेकवेळा विजेची समस्या असते त्यामुळे उपकारणाला डेटा गोळा करताना कुठलेही खंड पडू नये व तंतोतंत गोळा गोळा व्हावा या मुळे हे उपकारण विजेवर न बनविता सौरऊर्जेवर बनविण्यात आला आहे. शिवाय इंटरनेटशी जोडलेले सीम कार्ड आहे. हे सीमकार्ड शेताचे तापमान, मातीचा ओलावा, वाऱ्याची दिशा, वेग, सूर्यप्रकाश, पाऊस , धुके, दवबिंदू आदी माहिती एका ठिकाणी जमा करते. याच माहितीच्या आधारावर कोणता रोग पिकावर पडणार आहे. हे समजण्यात मदत मिळते, असं प्रतीक पितळे सांगतात.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/PNFb5Gx
No comments:
Post a Comment