Breaking

Wednesday, November 30, 2022

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पण पुढचे १० ते १५ दिवस धोक्याचे; काळजी घ्या! https://ift.tt/48F5OYl

मुंबई : गोवराचा फैलाव रोखण्यासाठी सुरू झालेल्या लसीकरणाचे आता चांगले परिणाम दिसत असून रुग्णसंख्येमध्ये घट होत आहे. मात्र पुढील १० ते १५ दिवस रुग्णसंख्येत उतार कसा होतो, हे पाहून संसर्ग नियंत्रणात आहे का, हे ठरवण्यात येईल, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. आज, गुरुवारपासून मुंबईमध्ये अतिरिक्त मात्रांसाठी लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. नऊ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या १४ आरोग्य केंद्रांतील एकूण ३,५६९ बालकांना ही गोवर रुबेला लशीची विशेष मात्रा देण्यात येणार आहे. रुग्णालयांतील ओपीडीमध्ये बुधवारी ३६ रुग्णांना दाखल करण्यात आले. ३० रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईमध्ये बुधवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. शहरात २,२९,९०४ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून ताप व पुरळ असलेल्या ९२ रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत ही लक्षणे असलेले एकूण ४,२७२ रुग्ण आढळून आले. गोवराचा उद्रेक असलेले विभाग ए, डी, इ, एफ उत्तर, जी उत्तर, जी दक्षिण, एच पूर्व, के पूर्व, के पश्चिम, पी उत्तर, आर दक्षिण, एल, एम पूर्व, एम पश्चिम, एस, एन दरम्यान, लसीकरणामुळे राज्यात गोवराचा संसर्ग मागील चार वर्षांत नियंत्रणात होता. परंतु आता या आजाराचा संसर्ग झपाट्याने वाढल्याचे दिसते. या वर्षी राज्यात गोवराच्या उद्रेकाच्या ठिकाणांची संख्या सर्वाधिक म्हणजे ८२ इतकी नोंदवण्यात आली आहे. सन २०१९मध्ये तीन, सन २०२०मध्ये दोन, सन २०२१मध्ये एका ठिकाणी गोवराचा उद्रेक झाला होता. यावर्षी राज्यात गोवराच्या सर्वाधिक ७२४ रुग्णांची नोंद झाली. संशयित रुग्णांची संख्या ११ हजार ७७७वर गेली. तर गोवरामुळे १५ जणांचे मृत्यू झाले. मुंबईत सर्वाधिक ११, भिवंडी येथे तीन, वसई-विरार येथे एका मृत्यूची नोंद झाली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/tLBEJSh

No comments:

Post a Comment