Breaking

Wednesday, November 9, 2022

​प्रवासी वाढले अन् ताणही; दोन दिवसांत २८ हजारांनी वाढ, मेट्रोवर अतिरिक्त सुरक्षारक्षक तैनात​ https://ift.tt/5c4UQBs

मुंबई : अंधेरीचा गोखले पूल बंद असल्याचा प्रचंड ताण मेट्रो १वर आला आहे. यामुळे अवघ्या दोन दिवसांत प्रवासीसंख्या २८ हजारांनी वाढली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर ताण आल्याने अतिरिक्त सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. अंधेरी पूर्व व पश्चिम जोडणारा गोखले पूल महापालिकेने डागडुजीसाठी दोन वर्षे बंद केला आहे. त्यामुळे अंधेरी पश्चिमेकडे जाणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. वाहनचालकांना दोन किमीचा फेरा मारावा लागत आहे. परिणामी एरव्ही रस्त्याने अंधेरी पश्चिमेकडे जाणाऱ्यांनी आता मेट्रो १ (घाटकोपर-वर्सोवा)चा आधार घेतला आहे. त्यामुळेच तेथील प्रवासीसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सोमवारी या मार्गावरील प्रवासीसंख्येत ११ हजाराने वाढ झाली. तर मंगळवारी ही वाढ १७ हजारांवर पोहोचली. येत्या काही दिवसांत ही वाढ २५ हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. ‘हा प्रश्न प्रामुख्याने अंधेरीला पूर्व-पश्चिम जोडण्याचा आहे. त्यामुळे अंधेरी आधीच्या साकीनाका, असल्फा या भागातून डीएननगर, आझादनगरदरम्यान प्रवास करणाऱ्यांचा आकडा सर्वाधिक आहे. तर एरव्ही अनेक चाकरमानी मेट्रोऐवजी दादरला जाऊन तेथून अंधेरीला जात. पण पूल बंद असल्याने अशा अनेक प्रवाशांनी आता घाटकोपरमार्गे अंधेरी, पश्चिम द्रुतगती मार्ग हे स्थानक गाठण्यास सुरूवात केल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच प्रवासीसंख्या वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चार अतिरिक्त काऊंटर वाढत्या गर्दीमुळे मेट्रो रेल्वे प्रशासनाने सकाळच्यावेळी घाटकोपर स्थानकावरील सर्व ११ काऊंटर्स सुरू केले आहेत. एरव्ही दुपारी कमी गर्दीच्यावेळी काऊंटर्सची संख्या चारवर आणली जाते. पण आता गोखले पूल बंद असल्याने होणारी गर्दी पाहता दुपारीही सात काऊंटर्स सुरू ठेवले आहेत. बंदूकधारी सुरक्षारक्षक गर्दीच्यावेळी संकट टाळण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आली आहे. विशेष बंदूकधारी (डबल बोअर) दोन अतिरिक्त सुरक्षारक्षक घाटकोपर स्थानकावर तैनात करण्यात आले आहेत. दुपारच्या वेळेतही गर्दी घाटकोपर दिशेने अंधेरीकडे जाताना दुपारी मेट्रोला अत्यल्प गर्दी असते. पण सध्या घाटकोपर स्थानकावर दुपारीही चांगली गर्दी असल्याचे ‘महाराष्ट्र टाइम्स’ प्रतिनिधीने स्थानकाला भेट दिली त्यावेळी दिसले. एरव्ही दुपारी काही तिकीट काऊंटर्स मोकळे असतात. पण सध्या दुपारीही सर्व काऊंटर्सवर रांगा दिसतात.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lVLDnkZ

No comments:

Post a Comment