() मधील टीम इंडियाचे आव्हान संपुष्टात आले आहे. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये जेतेपदासाठी लढत होणार आहे. मात्र अंतिम सामन्याच्या दिवशी पाऊस पडला, तर कोणाला विजेतेपद मिळणार, याची उत्सुकता क्रीडा रसिकांना लागली आहे. टी२० विश्वचषक २०२२ मध्ये आतापर्यंत पावसामुळे अनेक निकाल पालटले आहेत. कधी सामना रद्द करावा लागल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण बहाल करावा लागला, तर कधी मर्यादित षटकांचे सामने खेळवले गेले, कधी डकवर्थ ल्युईसच्या नियमानुसार आकडेवारी करुन विजेता ठरला. आयसीसीच्या नियमांनुसार, नियोजित तारखेला पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला, तर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस असतो. उपान्त्य फेऱ्या तर पार पडल्या, मात्र आता अंतिम फेरीच्या दिवशी म्हणजेच रविवार १३ नोव्हेंबरला पाऊस पडला, तर राखीव दिवशी सामना खेळवला जाईल. १९९२ चा विश्वचषकाप्रमाणे इंग्लंडला अंतिम सामन्यात हरवून पाकिस्तानला विजेतेपद पटकवण्याची मनिषा आहे. मात्र पावसामुळे पाकचं हे स्वप्न धुळीस मिळू शकतं १९९२ च्या विश्वचषकात काय घडलेलं? १९९२ विश्वचषक सेमीफायनल १ न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पाकिस्तान विजयी फायनल पाकिस्तान विजयी हेही वाचा : फायनलच्या वेळी पाऊस पडल्यास निकाल ठरवण्यासाठी किमान 10 षटके टाकली पाहिजेत, असं आयसीसीचा नियम सांगतो. मात्र राखीव दिवशीसुद्धा पाऊस पडला तर दोन्ही संघ 2022 च्या टी20 विश्वचषकाचे संयुक्त विजेते ठरतील. म्हणजेच दोघांनाही विजेते घोषित केले जाईल. त्यामुळे पाकिस्तान निर्विवाद विश्वविजेते होण्याच्या स्वप्नाची दाणादाण उडेल. हेही वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/1I7FZsy
No comments:
Post a Comment