Breaking

Saturday, November 19, 2022

अमानुष! तरुण जोडप्याला मारहाणीनंतर मूत्र पाजले, नंतर चपलांचा हार घातला, हे कारण https://ift.tt/CkNDBeH

जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरजवळ एक क्रूर घटना समोर आली आहे. तेथील लोकांनी एका जोडप्याला ओलीस ठेवून बेदम मारहाण केली. नंतर, जोडप्याला लघवी पिण्यास भाग पाडले गेले आणि नंतर चपलांचा हार घालून त्यांची धिंड काढण्यात आली. अमानुषतेची परिसीमा ओलांडणारी ही घटना तीन महिन्यांपूर्वीची आहे. मात्र या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. आता पीडितेने माधोराजपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे. ( by a mob near Jaipur and chained with shoes) १२ हून अधिक लोकांनी केले अत्याचार टोंक जिल्ह्यातील मालपुरा येथील रहिवासी असलेले दाम्पत्य या घटनेचे बळी ठरले आहे. पीडित तरुणाचे सन २००६ मध्ये लग्न झाले होते. २०१५ मध्ये तरुण आणि त्याच्या पत्नीमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर ते वेगळे राहत होते. हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी पत्नीने पतीविरुद्ध फिर्याद दिली. यानंतर तरुणाने दुसरे लग्न केले. गोपाल बगरिया, गोपालची पत्नी कमला बगरिया, राजेंद्र बगरिया, जगन्नाथ कालबेलिया आणि नौराती देवी यांच्यासह १२ हून अधिक लोकांनी या दाम्पत्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप तरुणांनी केला आहे. मारहाणीनंतर दोघांना चपला घालून लघवी पिण्यास भाग पाडले. अवैध संबंधाच्या संशयावरून चपलांचा हार घालून मूत्र प्यायला लावले ज्या लोकांनी तरुणावर हे अत्याचार केले ते लोक त्याच्या पहिल्या पत्नीचे नातेवाईक होते. या तरुणाचे पहिल्या पत्नीच्या भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपींना होता. मात्र, या अवैध संबंधांबाबत कोणताही पुरावा या लोकांकडे नाही. नुसत्या संशयावरून आरोपींनी तरुण आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीला ताब्यात घेऊन एका निर्जनस्थळी नेले. तेथे जोडप्याला चपलांचा हार घालून मारहाण करून मूत्र पाजण्यात आले. पीडितेने धाडस करून गुन्हा दाखल केला ही क्रूर घटना २२ मे रोजी घडली. या घटनेनंतर अंबालाल यांनी भीतीपोटी गुन्हा दाखल केला नाही. आता त्या घटनेशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पीडितेच्या पतीने धाडस दाखवत १२ हून अधिक जणांविरुद्ध माधोराजपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला अटक केली. जयपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष अग्रवाल यांनी सांगितले की, गोपाल बगरिया, कमला बगरिया, राजेंद्र बगरिया, जगन्नाथ कलबेलिया आणि नौरती देवी यांना अटक करण्यात आली आहे. तपासात अन्य आरोपींची नावे आढळून आल्यास त्यांनाही अटक करण्यात येईल, असेही ते म्हणाले. (माहिती - रामस्वरूप लामरोड, जयपूर)


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/s3XTv4d

No comments:

Post a Comment