पुणे : शिवत्व प्रतिष्ठानच्या (Shivatva Pratishthan) वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त साजरा साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे यंदाचे आठवे वर्ष होते. दरवर्षी सामाजिक संदेश देत हा दीपोत्सव साजरा करण्यात येत असतो. यंदा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या परिचित,अपरिचित स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण गमावले त्यांना हा दीपोत्सव समर्पित करण्यात आला. ( by lighting 5000k lamps) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये ५००० दिवे लावत हा दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आठ वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिवत्व प्रतिष्ठानची स्थापना केली. तर्फे दरवर्षी दिवाळीला त्रिपुरी पौर्णिमेला हा दीपोत्सव साजरा करण्यात येत असतो. क्लिक करा आणि वाचा- या दीपोत्सवानिमित्त नागरिकांना एक वेगळाच आनंद मिळत असतो. त्या करिता आम्ही हा दीपोत्सव दरवर्षी साजरा करत असतो. यावर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. त्यामुळे ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी आपला प्राण पणाला लावून स्वातंत्र्य मिळवलं, त्या शूरवीरांना यंदाचा दीपोत्सव समर्पित करण्यात आला आहे, अशी माहिती शिवत्व प्रतिष्ठानचे महेश भामरे यांनी दिली. क्लिक करा आणि वाचा- या महोत्सवाला डॉ. संजीव सोनवणे प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. प्रफुल्ल पवार कुलसचिव, उषा उर्फ माई ढोरे माजी महापौर पिंपरी चिंचवड महानगरपालिका राजेश पांडे व्यवस्थापन परिषद सदस्य, प्रसन्नजेत फडवणीस, व्यवस्थापन परिषद सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. तर या महोत्सवाला पुणेकरांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/iT9v5Kw
No comments:
Post a Comment