Breaking

Monday, November 21, 2022

शनवारी सांच्याला हळद, रव्वारी १ वाजून ३ मिंटाचा मुहूर्त! कोल्हापूरच्या पठ्ठ्याची लग्नपत्रिका व्हायरल https://ift.tt/GXnx1rQ

कोल्हापूर: हल्लीच्या सोशल मीडियाच्या युगात नजरेत भरणारी किंवा इतरांपेक्षा उठून किंवा हटके दिसणारी गोष्ट इंटरनेटवर क्षणार्धात व्हायरल होते. याचाच प्रत्यय सध्या कोल्हापूरातील एका पठ्ठ्याला येत आहे. या पठ्ठ्याच्या लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अर्थात त्याला कारणही तसेच आहे. कारण या लग्नपत्रिकेवरील मजकूर कोल्हापूरच्या खास रांगड्या बोलीभाषेत लिहला आहे. आपण एरवी लग्नाच्या ज्या पत्रिका पाहतो त्यावर अत्यंत साचेबद्ध मजकूर पाहायला मिळतो. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या लग्नपत्रिकेतील स्टार्ट टू एंड मजकूर असला काही भन्नाट लिहला आहे की, विचारायची सोय नाही. सुमित आणि श्वेता या जोडप्याची ही लग्नपत्रिका अनेकांना प्रचंड आवडली. त्यामुळे अल्पावधीत ही लग्नपत्रिका व्हायरल झाली. त्यानंतर ही लग्नपत्रिका नेमकी कोणाची असावी, असा प्रश्न अनेकांना पडला. त्याचे उत्तरही आता समोर आले आहे. ( card viral on internet) ही लग्नपत्रिका कोल्हापूरमधील R J Sumit याची आहे. येत्या २७ नोव्हेंबरला सुमित आणि श्वेता यांचे लग्न आहे. आपल्या हटके आणि रांगड्या स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या सुमितच्या मनात आपल्या लग्नाची पत्रिकाही हटके असली पाहिजे, असा विचार घोळत होता. त्यावर विचार करताना सुमितला ही सहजसोप्या आणि दैनंदिन वापरातील बोलीभाषेत लग्नाची पत्रिका लिहण्याची कल्पना सुचली. सुमितने त्याच्या लग्नाला येणाऱ्या नातेवाईकांसाठी पारंपरिक पद्धतीची वेगळी पत्रिका छापली आहे. मात्र, सोशल मीडियावर आपल्या आयडेंटिटीला साजेशी अशी लग्नपत्रिका असावी, असा विचार सुमितच्या डोक्यात होता. त्यानुसारच मी ही पत्रिका लिहल्याचे सुमितने सांगितले. सोशल मीडियावर लोक मला कोल्हापूरचा आर.जे. सुमित म्हणून ओळखतात. मग आपण आपल्याच भाषेत लग्नपत्रिका लिहूयात, असा विचार माझ्या मनात आला. मग मी स्वत:च लग्नपत्रिकेचा सर्व मजकूर लिहला. त्यानंतर एका मित्राकडे ही पत्रिका छापायला दिली. त्यांनीही माझा मजकूर पाहून त्याला साजेशी अशी डिजिटल पत्रिका तयार करुन दिल्याचे सुमितने सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/x2rL8Cg

No comments:

Post a Comment