पाटणा: बिहारमधील छपरा येथील सोनपूर जत्रेत रविवारी मोठी दुर्घटना घडली. येथे आकाश पाळण्याचा (स्विंग) एक भाग हायटेंशन वायरवर पडला. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. तातडीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सोनपूर जत्रेत सायंकाळी पाच वाजता अनेकजण या आकाश पाळण्यात बसले होते. तेव्हा अचानक हवेतच या पाळण्याचा एक भाग तुटून जवळील हायटेंशन वायरवर पडला. त्यामुळे अनेक लोक पडून जखमी झाले. हेही वाचा- रविवारच्या सुट्टीमुळे सोनपूर जत्रेत मोठी गर्दी झाल्याची माहिती आहे. अपघातामुळे सोनपूर जत्रेतील वीजपुरवठाही खंडित झाला होता. आकाश पाळणा तुटल्याने जत्रेत घबराट पसरली. घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी जखमींना बाहेर काढण्यात आणि त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावे आहे. हेही वाचा- स्थानिक पोलिसांनी घटनेच्या कारणाचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास आकाश पाळणा चालकांवर कठोर कारवाई करणार, असं पोलिसांनी सांगितले आहे. सोनपूरचे एसडीएम अनिल कुमार यांनी सांगितले की, या घटनेत एका व्यक्तीच्या नाकावर गंभीर जखम झाली आहे, तर ५-६ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/LkhOera
No comments:
Post a Comment