Breaking

Thursday, November 17, 2022

होणाऱ्या बायकोसाठी स्वस्त लेहेंगा पाठवला, नवरीला आला राग; अन् मग जे झालं ते पाहून पोलीसही चक्रावले... https://ift.tt/kdWH6xI

देहरादून: देशात लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. या दरम्यान वधू (Bride) आणि वर (Groom) सध्या शॉपिंगमध्ये व्यस्त आहेत. शालू, लेहेंगा, शेरवानी आणि बरंच काही खरेदी केलं जात आहे. अशातच उत्तराखंडमधून लग्नाशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याच लेहेंग्याच्या कारणामुळे एका नववधूने लग्नास नकार दिला आहे. कारण ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल. मुलाने मुलीला स्वस्त (Bridal Lehenga) घेऊन दिला म्हणून तिने चक्क लग्नाला नकार दिला आहे, मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलाने लखनऊहून १० हजार रुपये खर्च करून होणाऱ्या बायकोसाठी लेहेंगा मागवला होता. परंतु वधूला तो लेहेंगा आवडला नाही, त्यामुळे वधूने लग्नच (Bride Cancels Marriage) मोडलं. मात्र, हे प्रकरण इथेच थांबलं नाही तर थेट हल्दवानी पोलीस ठाण्यात पोहोचले. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तासाभराच्या वादानंतर दोन्ही पक्षात तडजोड करण्यात आली. आता दोन्ही पक्ष हे लग्न न करण्याच्या बाजूने आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हल्दवानी येथील एका तरुणीचे गेल्या जून महिन्यात अल्मोडा जिल्ह्यातील एका तरुणाशी लग्न ठरले होते. ठरल्यानुसार हे लग्न ५ नोव्हेंबरला होणार होते. नेमकं प्रकरण काय? रिपोर्टनुसार, मुलीचे लग्न अल्मोडा येथील एका मुलासोबत ठरवण्यात आले होते. जून महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला आणि ५ नोव्हेंबरला त्यांचं लग्न होणार होते. त्यासाठी दोन्हीकडून लग्नपत्रिका छापण्यात आला आणि त्यांचं वाटपही करण्यात आलं. यासोबतच लग्नाची सर्व तयारीही पूर्ण झाली होती. मात्र, जेव्हा नववधूने मुलाच्या बाजूने खरेदी केलेला लेहेंगा पाहिला आणि त्याची किंमत फक्त १० हजार रुपये असल्याचं तिला कळालं. तेव्हा तिने रागाने तो लेहेंगा फेकून दिला. वराने सांगितले की, तो लेहेंगा त्याने खास लखनऊहून मागवला होता. वराच्या वडिलांनी मुलीला तिच्या आवडीचा लेहेंगा खरेदी करण्यासाठी त्यांचे एटीएम कार्डही दिले. पण, या सगळ्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर हे प्रकरण हल्दवणी पोलिसांपर्यंत पोहोचले. मात्र तरीही तोडगा निघाला नाही. तासाभराच्या संघर्षानंतर अखेर दोन्ही बाजूंनी हे नातं तोडण्यात आलं. यावर दोन्ही पक्षांनी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, हल्दवाणी पोलिसांनी प्रकरण मिटवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण, ते अपयशी ठरले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/BbC8Fk5

No comments:

Post a Comment