पुणे: राष्ट्रवादीचे नेते () यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यात राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनीही या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जितेंद्र आव्हाड यांचे जो समर्थन करत असेल तर त्याला पण अटक करा. असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं आहे. (chandrasekhar bawankule) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाड प्रकरणी आपली भूमिका मांडली. जितेंद्र आव्हाड यांनी आज आमदारकीचा राजीनामा देतो असे ट्विट केल्यानंतर राज्यात राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहेत. तर, दुसरीकडे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवे विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. क्लिक करा आणि वाचा- राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा निषेध करत जितेंद्र आव्हाड यांनी या विरोधात आंदोलन करताना आपण आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. यावर बावनकुळे म्हणाले की, तो व्हिडीओ पाहा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नैतिकता असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाड यांचे निलंबन करायला हवं. तसेच, अशा घटना होत राहतात असे बोलणाऱ्या विरोधातही गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही बावनकुळे यांनी केली आहे. क्लिक करा आणि वाचा- यासोबतच जितेंद्र आव्हाड यांना आपल्या आमदारकीचा राजनामा द्यायचा असेल तर त्यांनी तो द्यावा, अजित पवार आणि शरद पवार हे त्यांचा राजनामा घेणार का?, असा सवाल उपस्थित करत आव्हाड याचं निलंबन करा अशी मागणीही यावेळी बावनकुळे यांनी केली आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/OSoTMCB
No comments:
Post a Comment