ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आणि त्याप्रमाणं त्यांनी राजीनामा विधानसभा अध्यक्षांच्या नावे जयंत पाटील यांच्याकडे सोपवला. आव्हाड यांच्या राजीनामास्त्रानं ठाण्याचं राजकारण संपूर्ण राज्यात चर्चेत राहिलं. दिवसा जितेंद्र आव्हाड यांचं प्रकरण चर्चेत होतं, तर रात्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे समर्थक आमने सामने आले. किसननगर परिसरात ही घटना घडली. ठाण्यातील किसननगर परिसरात उद्धव ठाकरे यांना मानणारे आणि एकनाथ शिंदे यांना मानणारे शिवसैनिक आमने सामने आले. ठाकरे गटाकडून ठाण्यात किसननगर परिसरात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या किसननगर परिसरात ठाकरे शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. ठाण्याचे खासदार राजन विचारे देखील उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी सुरुवातीला घोषणाबाजी केली आणि नंतर या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं आहे. शिंदे गटाचे योगेश जानकर यांच्याकडून उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिकांना मारहाण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाकडून नव्यानं मोर्चेबांधणी करण्यात येत होती. नव्या शाखांचं उद्घाटन करण्यात येत होतं, पण दोन्ही गटात वाद झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी आमचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडे आहेत त्यांच्या ऑफिसला गेलो होतो. तिकडून आम्ही निघालो होतो त्यावेळी १०० ते १५० लोकांनी येऊन त्यांना मारहाण करण्यात आली. आम्ही श्रीनगर पोलीस स्टेशलना आलो असून त्यांनी आमची तक्रार अर्धातास झाल्यानंतर देखील घेण्यात आली नाही. मुख्यमंत्री स्वत:च्या पदाचा गैरवापर करत असतील तर राज्याची जनता उघड्या डोळ्यांनी सर्व पाहतेय. महाराष्ट्रात अशी गुंडागर्दी कधी झाली नव्हती, असं राजन विचारे म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील राजकीय संघर्ष वारंवार वाढल्याचं दिसून येत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या विकृतीकरणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मनसेनं त्याला विरोध केला. मात्र, नंतर जितेंद्र आव्हाड यांना अटक कण्यात आली. आज ठाण्यात किसननगर भागात शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आल्याचं दिसून आलं.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/vaBOxPz
No comments:
Post a Comment