धुळे: आज सायंकाळी शेतातील काम आटोपून मजूरांना घरी घेऊन जात असतांना वाहन पलटी झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून यात सुमारे ० २० हून अधिक मजूर जखमी झाले आहेत. यात काही लहान बालकांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. झालेल्या या अपघातात गंभीर जखमींना धुळे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले असून काहींवर शिरपूर येथे प्राथमिक उपचार करण्यात येत आहे. ( in an accident at ) या अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार, शिरपूर तालुक्यातील आमोदे येथील मजूर शेतातील काम आपटून सायंकाळी पिकअप वाहनाने आपल्या घरी जात असताना हा भीषण अपघात झाला आहे. शिंदखेडा तालुक्यातील माळीच गोराणे भागात कापूस वेचणीसाठी हे मजूर गेले होते. क्लिक करा आणि वाचा- चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात सायंकाळी घरी परत येत असतांना कुरखळी फाट्याजवळ मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वाहनावरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटल्याने भीषण अपघात झाला. यात सुमारे २० हून अधिक मजूर जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये लहान बालकांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळत आहे. काही जखमी मजुरांना धुळे येथे रवाना करण्यात आले आहे. तर काही मजुरांवर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्लिक करा आणि वाचा- अपघातात तीन जण गंभीररित्या जखमी घटनेची माहिती मिळताच शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात गर्दी जमली असून सामाजिक संघटनांकडून मदत कार्य सुरु आहे. या जखमींमध्ये लहान मुले, महिला, पुरुषांसह चिमुकल्यांचा देखील समावेश आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती देखील प्राप्त होत आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/elEhHUT
No comments:
Post a Comment