बंगळुरु: कर्नाटकातील बंगळुरूमध्ये एका शाळेतील शिक्षकाने प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना उभं राहण्याची शिक्षा दिली. यादरम्यान एक मुलगी उभी असताना तिला चक्कर आली आणि ती तिथेच कोसळली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हे प्रकरण गंगम्मागुडी भागातील असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, निशिता गंगम्मागुडी येथील एका खाजगी शाळेत शिकत होती. शुक्रवारी शिक्षकाने वर्गातील सर्व मुलांना कुठल्यातरी कारणावरुन उभं राहण्याची शिक्षा दिली. शिक्षकांनी मुलांना वर्गात बसून नाही तर उभे राहून अभ्यास करण्याची शिक्षा दिली. यादरम्यान निशिताला चक्कर आली आणि ती पडली. हेही वाचा - शरीरावर जखमेच्या खुणा नाहीत शाळेतील लोकांनी निशिताला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. अहवालात मुलीच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. सध्या पोलिसांनी संशयास्पद परिस्थितीत अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. हेही वाचा - पोलिसांचे पथक शाळेत शनिवारी पोलिसांचे पथक तपासासाठी शाळेत पोहोचले. येथे शिक्षकांसह शाळेतील कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे. यासोबतच शाळेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही छाननी करण्यात येत आहे. निशिताचे वडील नागेंद्र भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये काम करतात. त्यांचे घर डोड्डनचेन्नप्पा येथे आहे. याप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/X23GNqR
No comments:
Post a Comment