Breaking

Saturday, November 5, 2022

महाराष्ट्रातील मराठा नेते शरद पवारांनी संपवले; माजी मंत्र्याने केला गंभीर आरोप https://ift.tt/uAVywNI

बारामती: आम्ही मराठ्यांचे नेते आहोत असे सांगतात, परंतु महाराष्ट्रातील मराठा नेते जर कोणी संपवले असतील तर ते (Sharad Pawar) यांनी संपवले, असा गंभीर आरोप माजी मंत्री (Vijay Shivtare) यांनी बारामतीत बोलताना केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेच्या विस्तारासाठी माजी मंत्री विजय शिवतारे बारामती इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. (former minister criticizes ) ईस्ट इंडिया कंपनीचे उदाहरण देत शिवतारे म्हणाले की, ईस्टइंडिया कंपनी व्यवहार करत करत अख्या देशावर कब्जा करून लंडनला निघून गेली. आणि महाराष्ट्रात पवार कंपनी आली. बारामती, इंदापूर तालुक्यातील साखर कारखाने काकडे, शेम्बेकर, जाचक यांनी मोठ्या मेहनतीने उभारले. मात्र सत्ता आणि पैशाच्या जोरावर कारखाने ताब्यात घेतले. सत्तेचा गैरवापर करून भ्रष्टाचारातून जमवलेल्या पैशातून निवडणुका जिंकायच्या असा घनाघातही यावेळी त्यांनी केला. क्लिक करा आणि वाचा- देवेंद्र फडणवीस यांनी चेकमेट केले- शिवतारे मुख्यमंत्री कोणीही झाले तरी बारामती सत्ता केंद्र बाहेर पडले नाही पाहिजे. कोणी ऐकत नसेल तर दुसऱ्याचं नाव सुचवलं जातं. त्यामुळे सर्व हाजी हाजी करतात. मात्र खऱ्या अर्थाने हे सत्ता केंद्र कोणी हलवले असेल आणि पहिल्यांदा कोणी चेकमेट केले असेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, असेही शिवतारे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- बारामती लोकसभा मतदारसंघाचा सातबारा कुणाच्या नावे नाही. हा सातबारा जनतेच्या हाती आहे. माझी लढाई परिवाराशी नसून प्रवृत्तीची आहे. जनतेची इच्छा असेल आणि सर्व पक्षांनी सांगितले तर राष्ट्रवादीच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवण्यास केव्हाही तयार असल्याचेही शिवतारे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3Y97xqO

No comments:

Post a Comment