मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून खासदार हे पक्षात दाखल झाले. यानिमित्तानं पक्षविरोधी कारवाई केल्यामुळं गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. खासदार गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात पक्षप्रवेश यांच्या उपस्थितीत केला आहे. आज मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळं कीर्तिकर यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं पत्रक खासदार विनायक राऊत यांच्याकडून जारी करण्यात आलं आहे. विनायक राऊत यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या पत्रात काय? शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. गजनान कीर्तिकर एकनाथ शिंदेंसोबत मुलगा ठाकरेंसोबत अमोल कीर्तिकर यांनी मात्र यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा निर्णय वैयक्तिक असल्याचं अमोल यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच अमोल किर्तीकर यांची शिवसेना उपनेते पदावर नियुक्ती केली. आदित्य ठाकरे भारत जोडोमध्ये पोहोचताच कीर्तिकर एकनाथ शिंदेंसोबतशिवसेना पक्षात फुट पडल्यापासून गजानन कीर्तिकर वारंवार त्यांची भूमिका मांडत होते. आपण राष्ट्रवादी, काँग्रेस सोबत आघाडीत न राहता स्वंतत्र राहू, असा विचार ते मांडत होते. आज आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्या भारत जोडोत लोकशाही आणि संविधानाच्या बचावासाठी दाखल झाल्याचं सांगण्यात आलं. नेमक्या त्याच दिवशी गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. गजानन कीर्तिकर हे मुंबईतील मालाड विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते. शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री होते.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी गुरुदास कामत यांचा अंदाजे १,८३,००० मतांच्या फरकाने पराभव केला. ते सलग दोन वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/mvaBiT4
No comments:
Post a Comment