पुणे : खडकवासला प्रकल्पातून पुणे शहराला सोडण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्यासह जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याचे नियोजन कालवा समितीच्या बैठकीत करण्यात येणार आहे. शेतीसाठी येत्या २५ डिसेंबरपासून पाणी सोडण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. कालवा सल्लागार समितीची शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. या बैठकीकडे जलसंपदा विभागासह पुणे महापालिकेचे लक्ष लागलं आहे. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची ही पहिलीच बैठक असल्याने पुण्याबरोबर जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याचाही फैसला होणार आहे. पुणे शहराला खडकवासला साखळी प्रकल्पातील खडकवासला, वरसगाव, पानशेत; तसेच पवना आणि भामा आसखेड या धरणांमधून पाणी सोडण्यात येते. शहरात ३४ गावे नव्याने समाविष्ट झाल्याने पुण्याच्या पाण्याची गरज वाढण्याबरोबर शेतीसाठी पाणी आवश्यक आहे. त्यामुळे पुण्याची पाण्याची गरज कमी होण्याऐवजी वाढत असल्याने पिण्याबरोबर शेतीलाही पाणी मिळण्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्क आहे. त्यामुळे शेतीसाठी पाणी कधी सोडायचे? किती प्रमाणात सोडणार याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्सुकता आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/NhCouwX
No comments:
Post a Comment