Breaking

Friday, November 18, 2022

सूर्याच्या आत फिरताना दिसला साप, हा व्हिडिओ पाहून तुमचंही डोकं चक्रावेल https://ift.tt/Q0ijWBr

लंडन: अंतराळात दर सेकंदाला अनेक हालचाली होत असतात. यापैकी काही संशोधनाद्वारे रेकॉर्ड करता येतात, तर काही रेकॉर्ड करणे फार कठीण असते. अलीकडेच आपल्या सूर्यमालेच्या मध्यभागी असलेल्या सूर्यामध्ये एक मोठी घटना दिसली आहे. प्रत्येक क्षणी सूर्याच्या आत स्फोटांची मालिका घडत असते, ज्याचे मुख्य कारण सूर्यातील हालचाली देखील आहे. परंतु आज जी घटना समोर आली आहे सर्वांना आश्चर्यचकित करणारी आहे. युरोपियन स्पेस एजन्सीने एक व्हिडिओ जारी केला आहे जे पाहून तुमच्या भुवया उंचावतील. या व्हिडीओमध्ये तुम्हाला साप सारखी गोष्ट रांगताना दिसेल. तथापि, सूर्याचे तापमान इतके जास्त आहे की कोणत्याही सजीवाला त्याच्यापर्यंत पोहोचणे अशक्य आहे. ही रेंगाळणारी गोष्ट काय आहे? याचं उत्तर संशोधकांनी दिलं आहे. काय आहे या व्हिडिओमध्ये युरोपियन स्पेस एजन्सीने जारी केलेल्या या ११-सेकंदाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्टपणे एक रेंगाळणारी गोष्ट दिसेल. ते आगीच्या लाटेसारखे दिसत आहे. याला सौर लहर म्हणता येईल. बाकीच्या स्फोटांप्रमाणे ही लाटही स्फोटांनी बनलेली आहे. शास्त्रज्ञांनी याला असे नाव दिले आहे. युरोपियन स्पेस एजन्सीने हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर २ आठवड्यांपूर्वी अपलोड केला होता, जो आतापर्यंत ३.५ लाख वेळा पाहिला गेला आहे. सूर्यमालेत अशा अनेक घटना घडत असतात ज्या संशोधकांना समजणंही कठीण असतं. अशा सौर लहरींसाठी सूर्याचे चुंबकीय क्षेत्रही कारणीभूत असल्याचे मानले जाते. लहरींच्या निर्मितीदरम्यान तापमानात चढ-उतार होत असतात आणि या चढउतारांमुळे अशा लहरी निर्माण होतात, असं शास्त्रज्ञ सांगतात.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lNGv4dx

No comments:

Post a Comment