अकोला: जिल्ह्यातील पातूर नंदापूर गावातील शेतकऱ्यांनी मिळालेली पीक विम्याची मदत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परत करण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीचा निषेध केला आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे पातूर नंदापूर परिसरातील सोयाबीन, तुरीसह सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यावेळी विमा कंपनीच्या नियमानुसार अनेक शेतकऱ्यांनी ७२ तासात पिक विमा कंपनीला फोन करून सूचना दिली होती. आता पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. या गावातीलच शितल सुरेश लाखे यांनी विमा हप्ता ९२७ रुपये भरले, असताना भरपाई मात्र ४१ रुपये ९५ पैसे इतकी देण्यात आली आहे. या प्रकारे विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टाच केली असल्याचं शेतकरी म्हणतात. काही शेतकऱ्यांना शंभर रुपये ते तीन हजार रुपयापर्यंतची भरपाई देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला, त्यावेळी सुद्धा विमा कंपनीला सूचना देण्यात आली होती. मात्र, विमा कंपनी प्रतिनिधींनी सर्वे केला नाही. परिणामी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीचा निषेध व्यक्त करून मिळालेली नुकसान भरपाई जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विमा कंपनीला सन्मान पूर्वक परत करत करण्याचा निर्णय घेतला. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारलं मात्र रक्कम स्वीकारण्यास घेण्यास नकार दिला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये शीतल लाखे, शंकर मटके, अनुराधा देवळे, भगवंत गवळी, सतीश नागे, विशाल सोनोने, विजय पुंडे, गणेश भोपळे, निलेश देवळे यांचा समावेश होता. ही तर शेतकऱ्यांची थट्टाच ! एक एकर तूर पिकाला विमा भरपाई रक्कम ४१ रुपये ९५ पैसे मिळाले. अर्थात संरक्षित रकमेच्या ०.३० टक्के व सोयाबीन पिकाचा जवळपास ५ टक्के भरपाई मिळाला. दरम्यान, अतिवृष्टीमुळे सोयाबीन व तूर पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यानंतर ७२ तासाच्या आत शेतकऱ्यांनी विमा कंपनीला कळविले. परंतु, या नुकसानीचा सर्व्हे करण्याकरिता विमा कंपनीचे प्रतिनिधी आलेच नाहीत. आता खात्यात तुटपुंजी रक्कम जमा करण्यात आल्याचे महिला शेतकरी शीतल लाखे म्हणाले. ८४४ भरपाईपोटी मिळाले केवळ ९० रुपये! पीक विमा कंपनीकडून आता शेतकऱ्यांची थट्टा होत असून पीक विम्यापोटी कंपनीकडे ८४४ रूपये भरणा केला. मात्र, पीक विम्याच्या भरपाई पोटी फक्त ९० रुपये मिळाले. रकमेचा भरणा केला तोही मिळाली नाही. आता ही मदत परवडणारी नसून पिक विमा कडून मिळालेली ९० रुपये ही मदत विमा कंपनीला परत करणार असल्याचे बाळापूर तालुक्यातील शेतकरी प्रभाकर घोगरे म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/sOyGTlF
No comments:
Post a Comment