Breaking

Tuesday, November 22, 2022

खुशखबर! कोकण रेल्वे मार्गावर विजेवर धावणाऱ्या गाड्या वाढणार; तेजस एक्सप्रेसही आता विजेवर धावणार https://ift.tt/vqBsnOj

रत्नागिरी : मार्गावरचे विद्युतीकरण करण्याचे काम पूर्ण झाल्यावर टप्प्याटप्प्याने कोकण रेल्वे मार्गावरती धावणाऱ्या गाड्या विजेवर धावणारआहेत. आता तेजस एक्सप्रेसही विद्युतभारीत इंजिनसह धावणार आहे. कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण झाल्यामुळे मालगाड्यांपाठोपाठ ऑगस्ट महिन्यापासून प्रवासी गाड्या देखील टप्प्याटप्प्याने विद्युत इंजिनासह चालवल्या जात आहेत. २५ नोव्हेंबर पासून ही एक्स्प्रेस विजेवर धावणार असल्याने आता प्रवास अधिक सुखकर होणार आहे. (Electric trains will increase on the Konkan railway line) तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कारकीर्दीत देशातील पहिली तेजस एक्सप्रेस मध्य तसेच कोकण रेल्वेच्या अखत्यारितील मुंबई सीएसएमटी ते करमाळी दरम्यान धावली. मोठ्या दिमाखात ही वातानुकलीत आलिशान गाडी कोकण रेल्वे मार्गावर धावत आहे. क्लिक करा आणि वाचा- रेल्वेकडून प्राप्त ताज्या माहितीनुसार, कोकण रेल्वे मार्गावर धावणारी लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी विकली एक्सप्रेस (२२११५/२१६), मुंबई सीएसएमटी ते मडगाव तेजस एक्सप्रेस (२२११९/२२१२०) तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली (२२११३/२११४) या गाड्या देखील आता विद्युत इंजिनवर धावणार आहेत. यातील २२११५/२२१६ ही एक्सप्रेस गाडी दिनांक २४ नोव्हेंबरपासून तर मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस दिनांक २५ नोव्हेंबरपासून विद्युत इंजिनसह धावणार आहे. क्लिक करा आणि वाचा- लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेलीदरम्यान धावणारी तिसरी एक्सप्रेस गाडी दिनांक २६ नोव्हेंबरच्या फेरीपासून विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे. त्यामुळे आता सिंधुदुर्ग तळकोकणात थांबणाऱ्या या गाडीचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणारी आलिशान तेजस एक्सप्रेस २५ नोव्हेंबरपासून विजेवर धावणार आहे. तेजससह इतर दोन एक्सप्रेस गाड्या देखील विद्युत इंजिनसह चालवण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/8FhtlMA

No comments:

Post a Comment