नाशिक : राज्यपाल भगतसिंह कोशारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजां संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ नाशिक मधील जाखुरी गावचा ग्रामसभेत सर्वानुमते ठराव करण्यात आला आहे. या ठरावाने नाशिकचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे . राज्यपाल आणि त्रिवेदी यांच्या वक्तव्याचे पडसाद आता खेडोपाडी देखील उमठायला लागले आहेत. नाशिक जिल्ह्यातील जाखोरी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत राज्यपाल यांच्या निषेधाचा ठराव केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जाखुरी ग्रामपंचायत ही राज्यातील पहिलीच ठराव घेऊन निषेध करणारी ग्रामपंचायत ठरली आहे. यावेळी गावातील ग्रामस्थांमध्ये देखील या वक्तव्यामुळे रोष निर्माण झाल्याचं दिसून आलेल आहे. महिला सरपंच मंगला जगले यांच्यासह संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य यांनी सर्वानुमते निषेधाचा ठराव केला आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे आजच्या व येणाऱ्या पिढीसाठी आदर्श त्यामुळे त्यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य सहन केलं जाणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत हा ठराव करण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरातील विविध संघटना शिवप्रेमी राजकीय संघटना राजकीय पक्ष आक्रमक झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे पाहायला मिळाले राज्यभरात राज्यपालांच्या निषेधार्थ केलेले विविध निदर्शन हे लक्षवेधी ठरले आहेत. नाशिक शहरात राज्यपालांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले तर कुठे प्रत्येकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले परंतु नाशिक मधील जाखोरी ग्रामपंचायत तिने घेतलेला निर्णयाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एका कार्यक्रमात शिवाजी महाराजांसदर्भात वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांना तात्काळ महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. साताऱ्याचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यांनी देखील राज्यपाल आणि सुंधाशू त्रिवेदीच्या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त केला होता. खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यपालांसदर्भातील पत्र दिलं आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट देखील आक्रमक झाला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/YDvdceX
No comments:
Post a Comment